Ads

आमदार किशोर जोरगेवार यांनी केली पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी

चंद्रपुर :- सततच्या पावसाचा शहरी भागासह ग्रामीण भागालाही मोठा फटका बसला असुन अनेकांच्या शेतात पाणी साचल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेक घरांचीही पडझड झाली आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी ग्रामीण भागाचा दौरा करत नुकसानीची पाहणी केली आहे. यावेळी उपस्थितीत अधिकाऱ्यांना आवश्यक सुचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. यावेळी तहसीलदार निलेश गौंड, कृषी अधिकारी भाऊसाहेब भराटी, तालुका कृषी अधिकारी बुक्कावार यांच्यासह संबंंधित अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती. MLA Kishore Jorgewar inspected the crops damaged by food water
सामन्य जनजीवनावर झाला आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही या पावसाची झड पोहचली आहे. नदी-नाल्या काठी असलेले शेत पावसाच्या पाण्याचे प्रभावित झाले आहे. अनेकांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतपिकांचे मोठे नुकसाण झाले आहे. आज या भागाची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असुन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी वढा, छोटा नागपूर, पांढरकवडा, विचोरा या गावांना भेट देत येथील पूरपरिस्थीतीची पाहणी केली. येथील नागरिकांची शेती पूर्णत: पाण्याखाली आल्याने मोठे नुकसान झाले असुन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढावली आहे. तसेच या पावासाने अनेक घरांचीही पडझड झाली आहे. ग्रामस्तांना रुग्णालयात नेण्यासाठी येथे रुग्णवाहीकेची सोय करण्यात यावी, मेडीकल कँम्प लावण्यात यावा, छोटा नागपूर येथील नाल्याचे खोलीकरण करण्यात यावे, नुकसानीचा पंचणामा करुन तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी, यासह अनेक आवश्यक सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी संबंंधित विभागाला केल्या आहे. यावेळी छोटा नागपुरच्या सरपंचा चित्रा गानफाडे, वढाचे सरपंच किशोर वरारकर, पांढरकवडाचे सरपंच सुरेश तोतडे, साखरवाही सरपंच नागेश बोंडे, छोटा नागपूरचे उपसरपंच ऋषभ दुपारे, यंग चांदा ब्रिगेडचे ग्रामीण तालुका अध्यक्ष राकेश पिंपळकर, जय मिश्रा, धनराज हणुमंते, संजु बोबडे, मनोहर जाधव, भास्कर नागरकर, प्रविण सिंग, सुर्यभान गानफाडे, भाग्यवान गनफुले, गणेश पाचभाई, सुरज मेघवानी, अमोल आमटे आदिंची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment