(भद्रावती तालुका प्रतिनिधी):- गरज ही शोधाची जननी आहे असे म्हटले जाते त्याचे प्रत्यंतर भद्रावती शहरातील श्रीराम नगर येथे पाहाव्यास मिळाले अतिवृष्टीचे पाणी साचल्यानंतर त्यातून घरापर्यंत जाणे येणे करण्यासाठी श्रीराम नगर येथील किसन मेश्राम यांनी पेनटचे प्लास्टिक डब्बे, खाद्यतेलाचे पिंप व बांबूच्या बल्ल्या यांच्या जुगाडातून चक्क तकलाडू स्वरूपाची नाव बनवून तिचा उपयोग पाण्यातून घराकडे जाण्यासाठी केला आहे.
शहरातील माणिका देवी मंदिर जवळील श्रीराम नगर येथील सखल असलेल्या जागेवर किसन मेश्राम, दादाजी चुदरी, अंबादास चुदरी, कवडू रेंपाकुलवार, बाळू टेकाम, गणेश टेकाम, मनोज लेनगुरे, पवन मेश्राम, वाघाडे ,नथू दाते अरविंद पोईनकर, भास्कर सिद्धमशेट्टीवार आदीं गरीबानी खुल्या असलेल्या बांधकाम विभागाच्या जागेवर घरे बांधली व तेथे आपला संसार उभा केलेला आहे. सतत आठ दिवस झालेल्या अतिवृष्टीचा फटका संपूर्ण तालुक्यासह भद्रावती शहराला बसला यात सततच्या पावसामुळे या सकल भागात पाणी साचून परिसरातील तेरा घरे ही पाण्यात गेली आहे. त्यामुळे नागरिकांना सभोवताल पाणी साचलेले असल्याने घराबाहेर निघणे हे बंद झाले. काहींच्या घरात पाणी शिरल्यामुळे ईतरत्र आश्रय घ्यावा लागला. पाण्यामुळे या गरीब नागरिकांची मोठी दानादान झाली. तसेच येथील 12 शाळकरी विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद झाले होते. मात्र मेश्राम यांच्या नावेमुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणेही शक्य झाले. सततच्या अतिवृष्टीमुळे येथील काही घरांची पडझड झाली असून येथील घरमालकांचे मोठे नुकसान झालेले आहे .घराबाहेर निघणे बंद झाले मात्र घराबाहेर निघाल्याशिवाय कसे चालणार यावर मेश्राम यांनी आपल्या कल्पकतेतून पेनटचे डबे, तेल पिप व बांबु वापरून एका जुगाडा सारखी नाव बदलली व त्या नावेद्वारे इकडे- तिकडे जाणे सुरू केले त्यांची ही युक्ती यशस्वी ठरली. सासलेल्या पावसातून त्यांनी पुराच्या काळात या पाण्यातून घरापर्यंत जाणे येणे सहजपणे केलेले आहे. त्याच्या या जुगाडी नावेची चर्चा मात्र शहरात चांगलीच रंगली आहे.
0 comments:
Post a Comment