Ads

फक्त माझ्या एकाच अतिक्रमण धारकावर कारवाई का ? मी गरीब आहे म्हणून

(प्रशांत गेडाम)सिंदेवाही:
नगरपंचायत क्षेत्रातील शीट क्रमांक ६ मधील बाजार चौकातील गुजरीच्या राखीव जागेवर अतिक्रमण करुन त्यावर पक्का बांधकाम केला असल्याने नगरपंचायत कडून अतिक्रमण काढण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, सिंदेवाही नगरपंचायत क्षेत्रातील शीट क्रमांक ६ मधील गुजरीच्या राखीव जागेवर भूषन मनोहर मेरुगवार रा. सिंदेवाही यांनी अतिक्रमण करुन पक्के बांधकाम केले. भूषन मेरुगवार यांची भाजीपाला विक्री ची दुकान अतिक्रमण केलेल्या ठिकाणी होती.

नगरपंचायत सिंदेवाही-लोनवाही यांच्याकडून भूषन मेरुगवार यांना अतिक्रमण करुन त्या ठिकाणी केलेले पक्के बांधकाम काढण्याबाबत वारंवार नोटीस देऊनही त्यांनी केलेला बांधकाम काढले नाही. त्यामुळे नगरपंचायत सिंदेवाही-लोनवाही यांनी दिनांक ४ ऑगस्ट ला दिलेल्या नोटीस नुसार शुक्रवार दिनांक ५ ऑगस्ट ला सकाळी केलेले भाजीपाला विक्रेते भुषण मेरुगवार याचे दुकानाचे अतिक्रमण नगरपंचायतकडून जेसीबी च्या सहाय्याने काढण्यात आले. यावेळी सिंदेवाही-लोनवाही च्या प्रभारी मुख्याधिकारी सुप्रिया राठोड, नगरपंचयतीचे सर्व कर्मचारी, सिंदेवाही पोलीस विभाग तसेच शेकडो नागरिक उपस्थित होते.
केलेली कारवाई नियमानुसारच👇🏼
याबाबत सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत च्या प्रभारी मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांना विचारना केली असता त्यांनी सांगितले की ही कारवाई नियमात राहूनच केली आहे. सदरचे अतिक्रमण धारक हे नगरपंचायत च्या परवानगी विना पक्के बांधकाम केले. केलेला बांधकाम काढण्याबाबत त्यांना अनेकदा नोटीस देऊन सुद्धा त्यांनी अतिक्रम काढले नाही त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

अतिक्रमण धारकाने व्यक्त केला रोष-
ही कारवाई फक्त माझ्यावरच का? माझ्या दुकानाच्या बाजूला त्या दूकानावर कारवाई का नाही ? नगरपंचायत क्षेत्रात मी एकट्याने अतिक्रमण केला व बांधकाम केला काय? मी गरीब आहे म्हणून कारवाई ? अशा अनेक शब्दात कारवाई दरम्यान अतिक्रमण धारकाने रोष व्यक्त केला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment