घुग्घुस प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घुग्घुसतर्फे न. प. ला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यासाठी गुरुवार, २२ सप्टेंबर रोजी घुग्घुस न. प. कार्यालयासमोर 'अर्धनग्न' आंदोलन करण्यात आले. NCP's 'half-naked' movement to give permanent chief minister for N.P.Ghugus

घुग्घुस नगर परिषदेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. हि समस्या लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घुग्घुसतर्फे न. प. कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, नितीन भटारकर, राजीव कक्कड, सुनील कुडे, बबलू दीक्षित यांच्या मार्गदर्शनात 'अर्धनग्न' आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी घुग्घुस न. प. ला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या अशी नारेबाजी करण्यात आली.
प्रभारी मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांना मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात
आले. येत्या दहा दिवसात कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात आला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा उपाध्यक्ष श्रीनिवास गोसकूला, सुरेश बोबडे, दिलीप पिट्टलवार, राज शेट्टी, गोविंद झाडे, सत्यनारायण डकरे, इस्लाम टेलर, मनोज सोनुले, अक्षय कोवाळे, अजय जुमडे, शरद कुमार, गोविंद गोगला, विशाल चंदनशीवे, आकाश दुर्गे, योहान इरगुराला, प्रीतम नागूलवार, क्षितिज जंगम, बादल निचकोला, नितेश पांडे, यासिन मिर्झा, गोविंद झाडे, संतोष गोडसेलवार, विनोद कनकम, बापूराव पाझारे, राकेश मदार, सागर तक्कला, संविधान अवताडे, हिमांशू कासवटे, प्रवीण कुम्मरवार, मधू कुप्पा उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment