Ads

तोतया आरबीआय अधिकाऱ्याने उडविले ग्राहकाच्या बँक खात्यातून ७० हजार

वरोरा :-वरोरा शहरातील एका ग्राहकाला भारतीय रिझर्व बँकेचा (आरबीआय) अधिकारी बोलतोय, असा फोन करून ॲप्स डाउनलोड होताच त्यांच्या खात्यातून ७० हजार रुपये उडविल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. श्रीकांत रमेशचंद्र रहाटे, रा. कमला नेहरू वार्ड वरोरा, असे फसवणूक झालेल्या बँक खातेदाराचे नाव आहे.70,000blew up from the customer's bank account by the fake RBI official

प्राप्त माहीत नुसार शहरातील कमला नेहरू वॉर्डातील रहिवासी श्रीकांत रहाटे यांच्या भ्रमणध्वनीवर भारतीय रिझर्व बँकेचा (आरबीआय) अधिकारी बोलतोय, असे सांगून एका अज्ञात इसमाचा कॉल आला. एसबीआय डिटेल खात्यातून १ हजार ८०० रुपये कटले आहेत. तुमचे क्रेडिट कार्ड हे बंद नसून चालू आहे. तुम्हाला ते परत हवे असेल तर तुम्ही एएनवायडीएस के आरबीआय हे अॅप डाऊनलोड करा, अशी सूचना केली. श्रीकांत रहाटे यांनी त्या कॉल्सची चौकशी न करता काही वेळातच अॅप डाउनलोड केले. अॅप डाऊनलोड होताच त्यांच्या एसबीआय वरोरा येथील बँक खात्यातून तत्काळ ७० हजार रुपये विड्रॉल झाल्याचा संदेश भ्रमणध्वनीवर आला. त्यामुळे घाबरलेल्या श्रीकांत राहाटे यांनी तातडीने कस्टमर केअरला customer care SBI भ्रमणध्वनी करून बँक खाते बंद केल्याने उर्वरित रक्कम सुरक्षित राहिली. रहाटे यांनी याबाबत वरोरा पोलिसात तक्रार केली आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment