Ads

वाघ व वन्यप्राण्यांपासून बचावासाठी मासेमारांना ६०मानवी मुखवट्यांचे वाटप

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोहर्ली वन परिक्षेत्रातील इरई धरण येथे मासेमारीसाठी जाणाऱ्या ६० मासेमारी करणाऱ्यांना मनुष्याचे मुखवटे वितरित करण्यात आले.
Distribution of 60 masks to fishermen to protect them from tigers and wild animals
वन्यप्राण्यांनी या मासेमारांवर हल्ला करून जीवितहानी होऊ नये, प्रसंगी मानव वन्यजीव संघर्ष उद्भवू नये म्हणून हे मुखवटेवाट केले आहेत.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात ८६ वाघ आहेत.वाघांच्या पिल्लांची संख्या ५० पेक्षा अधिक आहे. वाघांसोबत बिबट, अस्वल व इतर वन्यप्राणी देखील आहेत.

वन्यप्राण्यांनी माणसांवर हल्ला करू नये यासाठी वनविभागाच्या वतीने विशेष अभियान राबवण्यात येत आहे. याच अभियानाचा एक भाग म्हणून जंगलात जाणाऱ्यांना मनुष्याचे मुखवटे वितरित केले जात आहे. इरई धरण परिसरात बंगाली कॅम्प चंद्रपूर येथील ६० मासेमार नियमितपणे मासेमारी करण्यासाठी जात असून त्यांना भविष्यात मानव वन्यजीव संघर्ष उद्भवू नये आणि मासेमारी करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान व्हावी, कुणाचीही जीवितहानी होऊ नये यासाठी वनालगतच्या क्षेत्रात हिंस्त्र प्राण्यांपासूननिर्माण होणारा धोका टाळला जावा म्हणून दिवाळीनिमित्त मोहर्ली बफर वनपरिक्षेत्रामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ६० मासेमारी करणाऱ्यांना मनुष्य मुखवटे वाटप करून जंगलालगतच्या रस्त्यावरून येजाकरण्यासाठी वाहन ट्रॅक्टर पुरवण्यात आले
आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment