घुग्घुस : येथील काँग्रेस पक्षाचे नेते राजुरेड्डी व रोशन पचारे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी सांयकाळी सहा वाजता पोलीस स्टेशन घुग्घुस येथे ठाणेदार बबनराव पुसाटे यांची भेट घेऊन कोलवाशरीज मधून कोळसा चोरी करणाऱ्या वाहनांचे मालक तथा कोळसा वाहतुकीचा कंत्राट घेणाऱ्या बालाजी ट्रान्सपोर्टच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
येथील महामिनरल & बेनिफिशरीज प्रा. लि. या कोलवॉशरीज मधून 26 सप्टेंबर रोजी बालाजी ट्रान्सपोर्ट अंतर्गत कार्यरत वाहन MH34 - BG - 6229 यामध्ये जवळपास 35 टन कोळसा भरून ताडाळी रेल्वे सायडिंग करिता निघाला मात्र हा कोळसा अन्य ठिकाणी परस्पर विकल्या गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने 29 सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली याप्रकरणात पोलिसांनी ट्रक चालक प्रदीप वासेकर यांच्यासह अन्य काही जनावर कारवाई करीत मोठ्या मास्यांना सोडून छोटया मास्यांना अडकवून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय येत आहे ?
कोळसा चोरी करीता वापरला गेलेला ट्रक हा सत्तापक्षाच्या राजकीय नेत्यांचा असल्याने तसेच बालाजी ट्रान्सपोर्टचा संचालक हा मोठ्या राजकीय पक्षांचा प्रदेश उपाध्यक्ष असल्यानेच हा प्रकरण दडपण्याचा प्रकार केला जात आहे.
सदर कोळसा तस्करीच्या माध्यमातून मागील दोन वर्षांपासून महाजेनकोला कोट्यवधी रुपयांचा चुना लावल्या जात आहे.
याचा फटका विजेचा वापर करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागत असल्याने जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री यांनी कोळसा तस्करांवर नियंत्रणा करिता कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.
शिष्टमंडळात कामगार नेते सैय्यद अनवर, अलीम शेख, रोशन दंतलवार, विशाल मादर,नुरुल सिद्दिकी,अनुप भंडारी,रफिक शेख,दीपक पेंदोर,देव भंडारी,साहिल सैय्यद,सुनील पाटील,राकेश डाकूर,आरिफ शेख, व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment