Ads

विविध कार्यक्रम-उपक्रमांच्या माध्यमातून आपली बहुविध संस्कृती जपण्यासाठी गोवारी समाज प्रयत्नशील असतो - जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

तालुका प्रतिनिधी (भद्रावती):- भद्रावती तालुक्यातील घोटनिंबाळा (हेटी) येथील गोवारी जमात तथा ग्रामीण विकास सेवा समितीच्या वतीने “गायगोधन जत्रा” या पारंपारिक कार्यक्रमाचे काल आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
The Gowari community strives to preserve its diverse culture through various programs and activities - District President Devrao Bhongle
गावातील गायगोधनाच्या पटांगणावर गोधनाचे पुजन करून या आपल्या पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांना पारंपरिक घोंगडी व काठी भेट देऊन आयोजकांकडून सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की, गोंड गोवारी हे विविध कार्यक्रम-उपक्रमांच्या माध्यमातून आपली बहुविध संस्कृती जपण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. महाराष्ट्रात मुख्यत्वेकरून विदर्भभुमी मोठ्या संख्येने आढळून येणारा आपला गोंड गोवारी समाज पर्यावरणाशी सुसंगत अशी जीवनशैली जपत आजही परंपरागत गुरेढोरे राखण्याचे काम करतो. त्यामुळे आपसूकच आज गायगोधनाच्या दिवशी विदर्भातील जवळपास साडेचारहजार गावात हा गायगोधन पुजनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
आज भद्रावती तालुक्यात घोटनिंबाळा सारख्या छोट्याश्या गावातही सुमारे चारशे वर्षांपासून ही परंपरा जपल्या जाते. हे निश्चितचं अभिनंदनीय आहे.
पोळ्याच्या दिवशी आपण सर्व शेतकरीबांधव बैलांचे सेवामय पुजन करतो. परंतू गोधन असलेल्या गोमातेचे पुजन आजच्या निमित्याने केले जाते. हेच आपल्या संस्कृतीच्या सर्वसमावेशकतेचे उत्तम समन्वय आहे. आपल्या संस्कृतीत गोधनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गायीला आपण मातेच्या स्थानी मानतो. गायीचे पूजन करताना आपल्यामध्ये ममत्वाचे भाव निर्माण होतात. त्यामुळे अशा कार्यक्रमांमधून परंपरेच्या जतनाबरोबरच पुढील पिढ्यांसाठी आदर्श निर्माणाचे देखील कार्य होते.
पुढे बोलताना, आयोजकांनी समाजाच्या प्रमाणपत्रासाठीची याठिकाणी मला निवेदन दिले. खरेतर आपले नेते, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार हे आपल्या कार्यक्रमाला येणार होते परंतू प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे ईच्छा असुनही ते येऊ शकले नाही. पण आपल्या गोंड गोवारी समाजाची ही आवश्यक मागणी लवकरात लवकर पुर्ण व्हावी, यासाठी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून लवकरच यासंदर्भात उच्चस्तरीय बैठक लावून तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाला, आदिवासी गोंडगोवारी संस्कृती व कल्याण मंडळाचे अध्यक्ष गजानन कोहळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष अमित गुंडावार, अफजलभाई, आकाश वानखेडे, कैलाश राऊत, माधव कोहळे, शुभांगी राऊत, सचिन चचाने, लताबाई दुधकोहळे, राहुल परसे, दिलिप राऊत, हनुमान नागोसे, विलास राऊत, वसंता नागोसे, अनिल नेहारे, प्रविण राऊत, संजय रामटेके, देवेंद्र चामलाटे, बबलू नेवारे, सुभाष राऊत, प्रमोद राऊत आदिंसह मोठ्या संख्येने समाजबांधवांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment