भद्रावती तालुका प्रतिनिधी :येथील स्थानिक श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव दोन दिवसीय कार्यक्रम विविध कार्यक्रम आयोजित केले होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी नलगंटिवार व्यवस्थापकीय अधिक्षक संधिनिकेतन आनंदवन वरोरा प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अनीलभाऊ धानोरकर नगराध्यक्ष भद्रावती, मा. श्री. संतोषभाऊ आमने, मा.श्री. प्रफुल्लभाऊ चटकी, सत्कार मुर्ती कोरोना योध्दा मा. श्री. डॉ. अभय नक्षिणे प्रधान चिकित्सक अधिकारी ओ. एफ. सी. (चांदा) भद्रावती , मा. श्री. प्रशांत लाखे रुग्णवाहिका पायलट भद्रावती, सौ. प्रियंका चौधरी, ए्.एन.यु. परिचारिका भद्रावती, सौ. स्वाती दैवलकर आशा वर्कर सेविका भद्रावती हे प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी नलगंटिवार यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे मा्. श्री. अनीलभाऊ धानोरकर नगराध्यक्ष यांनी हायमाॅक्स लाईट, संडास- बाथरूम व मंदिर परिसरात गट्टटु लावून देण्याचें आश्वासन दिले. कोरोना योध्दांचा शाल श्री फळ व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच गुणवंत विध्यार्थ्यांनमध्ये प्रशांत मधुकरराव वाटेकर, आदित्य सौदाने व तन्मय हणुमंते यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमात दि. १० ऑक्टोबरला सकाळी श्री ची स्थापना, पूजा व आरती, दुपारी महिला संमेलन व आनंद मेळावा यामध्ये महिलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यंजन बनवून आनले होते. यांचा भरपूर आंनद स्वाद घेण्यात आला. सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व विचार मंथन, पोथीचे पारायण व भजन दि. ११ ऑक्टोबर ऑक्टोबरला सकाळी सामुदायिक ध्यान, श्री चा अभिषेक, पुजाआरती यानंतर पालखी सोहळा व शोभायात्रा भद्रनाग मंदिर ते नगाजी महाराज मंदिर परिसरात काढण्यात आली. या करीता विश्वकर्मा महिला भजन मंडळ हनुमान नगर, ओम शिवशक्ती महिला भजन मंडळ, शारदामाता महिला भजन मंडळ नगाजी नगर भद्रावती दुपारी जाहीर किर्तन (गोपाल काला) ह. भ. प. श्री अशोक सुर्यवंशी महाराज तळेगाव जि. वर्धा साथ संगत श्री गजानन क्षिरसागर आणि संच भद्रावती गुणवत्ता विध्यार्थी व कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीते करीता पुण्यतिथी महोत्सव समितीचे अध्यक्ष श्री. बंडु व्ही लांडगे, कार्याध्यक्ष श्री. रविंद्र हणुमंते, सचिव श्री. सचिन नक्षिणे, उपाध्यक्ष श्री. हरीश घुमे, कोषाध्यक्ष श्री. शंकरराव हणुमंते, सहसचिव श्री. सुरेशभाऊ, जमदाडे, रमेशराव खातखेडे,बापुराव जुनारकर, भाऊराव दैवलकर,प्रकाश दैवलकर, वामनराव चौधरी, मुर्लिधराव मेश्राम, सुभाष मांडवकर, पांडुरंग हणुमंते अध्यक्ष नाभिक दुकानदार असोसिएशन, प्रशांत नक्षिणे,राजेश येसेकर, विजय मेश्राम, सतीश मांडवकर, शौलेश नागपुरे,नंदु नक्षिणे, सागर घुमे, सतिश जांभुळकर, पियुष घुमे, महिला अध्यक्ष सौ. मायाताई चिंचोलकर, सचिव सौ. वर्षाताई वाटेकर, कार्याध्यक्षा सौ. नंदिनी लांडगे, उपाध्यक्षा सौ. छायाताई जमदाडे, सहसचिव सौ. योगिताताई सैदाने, कोषाध्यक्षा सौ. स्मिताताई नागपूरकर, श्रीमती सुधाताई हणुमंते, सौ. विमलताई नक्षिणे, सौ. नक्षिणे, सौ. रंजना लांडगे, श्रीमती कुसुमताई नागपुरे, सौ. गौरी नक्षिणे, सौ. मनीषा नक्षिणे, सौ. मंदाताई नक्षिणे, सौ. मंजुषा मेश्राम, सौ. शोभाताई लांडगे, या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री मधुकरराव वाटेकर सर, प्रास्ताविक श्री. बंडु व्ही लांडगे यांनी तर उपस्थितांचे आभार श्री. हरीश घुमे. यांनी मानले.
0 comments:
Post a Comment