Ads

देशाच्या इतिहासात ही पहिलीच यात्रा : काँग्रेस नेते खासदार मुकुलजी वासनिक

चंद्रपूर - काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला देशभरात अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळत आहे.This is the first trip in the history of the country: Congress leader and Rajya Sabha MP Mukulji Wasnik
नोव्हेंबरमध्ये ही यात्रा महाराष्ट्रातून पुढील प्रवास करणार आहे. त्यात नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यातून हि यात्रा जाणार आहे. देशाच्या इतिहासात ही पहिलीच यात्रा असून यात चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन यात्रेला आपला पाठिंबा द्यावा, असे आवाहन काँग्रेस नेते तथा राज्यसभा खासदार मुकुलजी वासनिक यांनी केले आहे.

आज भारत जोडो Bharat jodo यात्रेविषयी काँग्रेस नेते तथा राज्यसभा खासदार मुकुलजी वासनिक यांच्या नेतृत्वात नियोजन बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार अविनाश वारजूरकर, मुजीब पठाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस जेष्ठ नेते विनायक बांगडे, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, सेवादल जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, सुभाष गौर, प्रफुल खापडे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अहिरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनेश चोखारे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, राजेश अडूर, एनएसयूआय जिल्हाध्यक्ष यश दत्तात्रय, यासह अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

या यात्रेत राज्यातील लाखो काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक यात्रेत सहभागी होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून खासदार बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली 25 हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने यात्रेत सहभागी होणार आहेत. हजारो तरुण बाईक रॅली काढून यात्रेला आपला पाठिंबा देणार आहे. भारत जोडो यात्रेचा 3500 किमीचा प्रवास हा काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. ही भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरपासून महाराष्ट्रमध्ये येत आहे. सात ते 11 नोव्हेंबर दरम्यान ती नांदेड जिल्ह्यात, 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यात, 15 ते 16 नोव्हेंबर रोजी वाशिम जिल्ह्यात, 16 ते 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि 18 ते 20 रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गाक्रमन करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी वाशीम शहरातील अजनखेड, बोराला फाटा येथे १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सहभागी होण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.

यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबींवर प्रकाश टाकला. त्यासोबतच या यात्रेत मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील नागरिक सहभागी होणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी प्रत्येक पंचायत समिती, नगर परिषद, महानगर पालिका येथील पदाधिकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर स्वयंपूर्तीने सहभागी होणार असल्याची माहिती दिली. अन्य मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.

या यात्रेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह इतर पक्षातील नेते आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाठिंबा दर्शवावा, असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment