Ads

वाघाच्या हल्ल्यात वेकोली कामगार गंभीर जखमी

घुग्घुसः घुग्घुस येथून जवळच असलेल्या वेकोलि वणी क्षेत्राच्या नीलजई -२ कोळसा खाणीत मंगळवार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६वाजताच्या सुमारास केशव बापुराव नांदे (५६) यांच्यावर आरसी ऑफिस जवळ वाघाने हल्ला केला. हे बघून तेथील काही कामगारांनी आरडाओरडा करीत धाव घेतली त्यामुळे वाघाने पळ काढला.
WCL worker seriously injured in tiger attack
केशव बापुराव नांदे हे वेकोलि वणी क्षेत्राच्या नीलजई-२ कोळसा खाणीत फिटर पदावर कार्यरत आहे. सायंकाळच्या सुमारास ते आरसी ऑफिस जवळ काम करीत असतांना अचानक वाघाने त्याच्यावर हल्ला केला. हे बघून शेजारी काम करणाऱ्या काही नागरिकांनी आरडाओरड करीत तिकडे धाव घेतली. त्यामुळे वाघाने तिथून पळ काढला. जखमी अवस्थेत केशव नांदे यांना घुग्घुस येथील राजीव रतन केंद्रीय चिकित्सालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले. याबाबत कळताच वेकोलि कामगार संघटनेच्या नेत्यांनी, भाजपा नेत्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी राजीव रतन चिकित्सालयाकडे धाव घेतली. पुढील उपचारासाठी केशव नांदे यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वेकोलि नीलजई-२ कोळसा खाण परिसरात वाघाचे दर्शन झाल्याचे
प्रत्यक्षदर्शिचे म्हणणे आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment