Ads

सावली तालुक्यातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

सावली तालुका प्रतिनिधी:
सावली तालुक्यात दिवसेंदिवस वाघाचे हल्ले वाढत असून एकाच आठवडयात वाघाच्या हल्यात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. कैलास लक्ष्मण गेडेकर वय 47 वर्षे निलसनी पेडगाव व बाबुराव बुधाजी कांबळे वय 60 वर्षे रुद्रापुर अशा अनेक घटना तालुक्यातील घडल्या असल्याने जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन्यप्राण्यांच्या दहशतीखाली जीवन जगत आहेत. तालुक्यातील बहुतांश गावे ही जंगलालगत असल्याने शेतीसुध्दा जंगलालगतच आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा जंगलातच नाहीतर गावशेजारी,शेतात मोठया प्रमाणात वावर आहे. दिवसेंदिवस वन्यजीव व मानव संघर्ष वाढीस लागला असून वन्यप्राण्यांच्या हल्यात अनेकजण जखमी व बळी जात आहेत. त्यातच वन्यप्राण्यांकडुन शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.वन्यप्राण्यांच्या भितीमुळे शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत.
Rakesh Golepalliwar's demand that timely measures should be taken for the protection of taluka resident's
या वन्यजीव हल्ले थांबवावे आणि या वाघांचा बंदोबस्त करण्यात यावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधिर भाऊ मुनगंटीवार यांना मा.तहसीलदार पाटील साहेब व मा.आर एफ ओ.विरुटकर साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यातील वाढते हल्ले व शेतकऱ्याचे होणारे नुकसान आदी बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करुन सावली तालुक्यातील वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करुन जंगल गावालगत तार कंपाऊंड व सौर ऊर्जेचा वरील सौर दिवे लावण्यात येवुन तालुकावासीयांचे संरक्षणाच्या दृष्टीने वेळीच उपाययोजना करण्यात यावे,अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते राकेश गोलेपल्लीवार यांनी केली आहे. यावेळी उपस्थित श्री दादाची पा.किनेकार ग्रामपंचायत उपसरपंच साखरी,खोजिंद्र येलमुले पुण्यनगरी प्रतिनिधी कवठी हे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment