Ads

आम आदमी पार्टीचे गुजरातचे पूर्व प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे सहप्रभारी गोपाल भाई इटालिया यांचे भद्रावतीत आगमन...

जावेद शेख (तालुका प्रतिनिधी
भद्रावती):आज दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी आम आदमी पार्टीचे गुजरातचे पूर्व प्रदेशाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे सहप्रभारी माननीय गोपाल भाई इटालियाजी व विदर्भ संयोजक प्राध्यापक मा.डॉ. देवेंद्रजी वानखडे यांचे आज भद्रावतीत आगमन झालं.
Arrival of Aam Aadmi Party former state president of Gujarat and co-incharge of Maharashtra Gopal Bhai Italia in Bhadravati...
आम आदमी पार्टीचे विदर्भ अध्यक्ष प्राध्यापक मा.डॉ. देवेंद्रजी वानखडे जी हे नागपूर शिक्षक मतदार संघातून आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे. शिक्षणाचा मुद्दा, शिक्षकांचे जुनी पेन्शन चा मुद्दा, शिक्षकांवर होत असलेले अन्यायाचे मुद्दे असे खूप सारे मुद्दे घेऊन
मा.डॉ.देवेंद्रजी वानखडे हे शिक्षक मतदार संघाच्या रिंगणात उतरले आहे. त्यांच्या प्रचाराकरिता गोपाल भाई इटालिया हे सुद्धा भद्रावतीत आले होते. आम आदमी पार्टी भद्रावतीच्या कार्यकर्त्यांनी गोपाल भाई इटालिया व डॉ. देवेंद्रजी वानखडे यांच बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे जल्लोषात स्वागत करण्यात आलं गोपाल भाई इटालिया यांनी सर्वांचं आभार व्यक्त केलं व आम आदमी पार्टीच्या कामाकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या. या वेळी तालुकाध्यक्ष सोनल पाटील, तालुका सचिव सुमीत हस्तक, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, सुरज भाऊ शहा, प्रफुल्ल भाऊ शेलार, शहर उपाध्यक्ष आशिष तांडेकर, शहर सचिव विजयभाऊ सपकाळ, शहर संघटन मंत्री अनिलकुमार राम, शहर कोषाध्यक्ष सरताज भाऊ शेख, सचिन भाऊ पाटील, मंगेश भाऊ खंडाळे, केशवभाऊ पचारे, श्यामभाऊ पिंपळकर, नितीन भाऊ देवगड़े, रितेश नगराळे, राजेश भाऊ नरवडे, बाळूभाऊ बांदुरकर, प्रदीप भाऊ लोखंडे, चेतन भाऊ खोब्रागडे, संजय भाऊ सातपुते, डोरी भाऊ स्वामी, घनश्याम भाऊ गेडाम, राजू भाऊ कोड़ापे, अतुल रोडगे, शुभम रामटेके, शुभम भोस्कर, विकी मुळेवार, दिलीप कापकर, सुभाष कोडापे, सचिन मुरसकर, अनिल कोकुडे, गौरव चांदेकर, बाळकृष्ण पिंपळकर, आनंद पुसाटे व इतर कार्यकर्ते उपस्थीत होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment