भद्रावती प्रतिनिधी जावेद शेख: भारत सरकारच्या युवा आणि खेळ मंत्रालयाच्या वतीने नेहरू युवा केंद्राद्वारा आयोजित २६ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवात १२ ते १६ जानेवारी दरम्यान ऐतिहासिक नगरी हुबळी-धारवाड (कर्नाटक) येथे होत आहे.या महोत्सवात सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातुन नेहरू युवा केंद्राच्या वतीने जिल्हा युवा अधिकारी समशेर सुभेदार यांच्या मार्गदर्शनाखाली व मा.भद्रावती तालुका समन्वयक आशिष सुरेश हनवते यांच्या पुढाकाराने चंदनखेडा येथील कुणाल गुलाब ढोक,भुपेश प्रभाकर निमजे, या युवकांची निवड करण्यात आली.
'विकसित युवा-विकसित भारत' 'Developed Youth-Developed India' या थीमवर यावर्षीचा महोत्सव होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्हाबरोबर देशभरातील युवा सहभागी झाले आहेत.
या महोत्सवात देशभरातील विविध संस्कृती, क्रीडा, पोशाख, खानपान यांचे प्रत्यक्ष दर्शन युवकांना घडवून आणण्यात येणार आहेत.सोबतच विविध विषयांवर मार्गदर्शन शिबिर सुद्धा यावेळी पार पडणार आहे.येथे युवकांची मांदियाळी राहणार आहे.
0 comments:
Post a Comment