Ads

औषधसाठा उपलब्ध असतांना रुग्णांना बाहेरुन औषध विकत घ्यायला लावण्याचे प्रकार तात्काळ थांबवा - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहे. रुग्णांचे समाधान होईल अशी वागणूक आपण ठेवली पाहिजे. रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध असतांनाही त्यांना बाहेरुन औषध विकत आणायला सांगणे हा अतिशय चुकिचा प्रकार असुन हे प्रकार तात्काळ थांबवा असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाला दिले आहे.
आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडु रामटेके, उप निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चांदेकर, डॉ. तेजस्वीनी चौधरी, डॉ. रोहित होरे, डॉ. प्रशांत मगदुम, डॉ. ऋतुजा गनगारडे यांच्यासह महिला शहर संघटिका वंदना हातगावर, युवती तथा वैद्यकीय सेवा प्रमुख भाग्यश्री हांडे, आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, राशेद हुसेन, विश्वजीत शाहा, देवा कुंटा, बबलु मेश्राम, रुपा परसराम, दुर्गा वैरागडे, आदींची उपस्थिती होती.Immediately stop forcing patients to buy medicine from outside when stock is available -MIa. Kishore Jorgewar
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय येथे जिल्हासह बाहेर जिल्हातील रुग्ण उपचाराकरिता येत असतात. त्यामुळे रुग्णांचे समाधान होईल असे उपचार येथे झाले पाहिजे. रुग्णांशी तथा त्यांच्या नातलगांशी आपली वागणुक योग्य असली पाहिजे. अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. रुग्णालयातील अनेक वार्डात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. ती तात्काळ दुर करा. आपण येथे 100 पिण्याच्या पाण्याच्या कॅन उपलब्ध करुन दिल्या आहे. येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आणखी काही उपाययोजना असेल तर त्या रुग्णालय प्रशासनाने सुचवाव्यात अशा सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. रुग्णालयातील ब्लड स्टेटींग लॅबच्या बाबतीतही अनेक तक्रारी आहेत. रुग्णांच्या रक्ताचा नमुना प्राप्त झाल्या नंतर त्याचा अहवाल कमीत कमी वेळेत देण्याचा प्रयत्न करा, ब्लड लॅब येथील व्यवस्था सुसज्ज करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. आयसीयु च्या अनेक बेडवर ऑक्सिजन व्यवस्था सुरळीत करण्याच्या सुचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहे. पाहणी दरम्याण प्रसुतिकक्षात रुग्णांना बाहेरुन औषध लिहुन देत असल्याची तक्रार रुग्णांनी केली. यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. रुग्णालयात औषधसाठा उपलब्घ असतांनाही बाहेरुन औधष आणायला लावने हा प्रकार गंभीर आहे. यापुढे हे खपवून घेतल्या जाणार नाही. हे प्रकार बंद करा अशा सुचना यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. येथील डॉक्टरांच्या काही मागण्या रास्त आहे. त्या सोडविण्याच्या दिशेनेही रुग्णालय प्रशासनाने प्रयत्न करावेत. डॉक्टरांनीही संपाचा मार्ग स्किकारु नये असेही यावेळी डॉक्टरांना आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले.


*पाणी नसल्यामुळे मोतीया बिंदुची शस्त्रक्रिया तिन दिवस थांबणे हे संतापजनक - आ. जोरगेवार*

रुग्णालयात पाहणी दरम्याण पाणी उपलब्ध नसल्याने मोतीया बिंदुवरील शस्त्रक्रिया तिन दिवस लांबली असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या निदर्शनास आले. यावर आमदार किशोर जोरगेवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. घडलेला हा प्रकार संतापजनक असुन यापूढे असे प्रकार खपविल्या जाणार नाही अशा शब्दात आमदार किशोर जोरगेवार यांनी रुग्णालय प्रशासनाला खडसावून सांगीतले. पाणी नव्हते तर ते रुग्णालय प्रशासनाने आमच्या लक्षात आणुन देणे अपेक्षित होते. मात्र रुग्णालयातील समस्या या रुग्णालय प्रशासनाकडून आमच्या पर्यंत कधीच पोहचत नाही. रुग्णांकडून येथील समस्यांची माहिती आमच्या पर्यंत येते. यापूढे असे चालणार नाही. येथील अडचणी या रुग्णालय प्रशासनाने आमच्या पर्यंत पोहचवाव्यात. येथे पाण्याची समस्या होती. तर महानगरपालिकेकडून पाणी उपलब्ध करता आले असते. असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment