(प्रशांत गेडाम)नागभीड :-
चिमूर विधानसभेचे लोकप्रिय व विकासपुरुष मा.किर्तीकुमार (बंटीभाऊ ) भांगडिया यांचे चरित्र मलीन करण्याच्या दृष्टीने आणि राजकीय सुढ बुद्धीने त्यांचेवर चिमूर पोलिस स्टेशन येथे खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी आपला निषेध दर्शविण्यासाठी भारतीय जनता पार्टी तालुका नागभीड च्या वतीने आज नागभीड बंद आणि भव्य मूक मोर्चाचे आयोजन तालुकाध्यक्ष संतोष भाऊ रडके यांच्या नेतृत्वात केले होते.Against the false case against A. Bhangdia, Taluka BJP issued a statement to the Tehsildars by holding Nagbhid bandh and silent march.
पुकारण्यात आलेल्या बंद ला नागभीड येथील छोटे मोठे व्यापारी यांनी आपआपली प्रतिष्ठाने सकाळपासून बंद ठेऊन आपले सहकार्य दर्शविले तर आयोजित केलेल्या मूक मोर्चाला तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील महिला आघाडी,युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते सोबत सामान्य जनतेनी हजारोच्या संख्येने उपस्थितीत राहून आमदार बंटीभाऊ भांगडिया यांचे समर्थनार्थ आपला पाठिंबा दिला.मा.आमदार साहेबांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यासंदर्भात मा.मुख्यमंत्री याचे नावे निवेदन मा.पोलिस निरीक्षक योगेश घारे सर व मा.तहसीलदार मनोहर चव्हाण सर यांना दिले गेले. आणि त्वरित गुन्हे मागे न घेतल्यास यापेक्षाही उग्र असा आक्रोश मोर्चा काढण्याची चेतावनी भारतीय जनता पार्टी तर्फे केली गेली.
मूक मोर्चा मध्ये कु.अलकाताई आत्राम जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, वसंतभाऊ वार्जुरकर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, राजूभाऊ देवतळे भाजपा ओबीसी आघाडी उपाध्यक्ष,मनीष तुम्पल्लीवार भाजयुमो प्रदेश सचिव, मनोज रडके तालुकाध्यक्ष शिवसेना शिंदे गट, उमाजी हिरे माजी नगराध्यक्ष न.प.,गणेश तर्वेकर उपाध्यक्ष न.प.,जगदीश सडमाके तालुका महामंत्री,देवा बावनकर भाजयुमो तालुकाध्यक्ष, श्रीमती इंदुताई आंबोरकर महिला आघाडी तालुकाध्यक्ष, सौ. दिपालीताई मेश्राम माजी.पं.स. सदस्य, सचिन आकुलवार माजी बांधकाम सभापती,शिरीष वानखेडे माजी नगरसेवक,दशरथ उके माजी नगरसेवक,रुपेश गायकवाड माजी नगरसेवक, सौ.दुर्गा चीलबुले माजी नगरसेविका,सौ.पद्माताई कामडी,सुनील शिवणकर तालुका महामंत्री,धनराज बावनकर जि.प.प्रमुख,रमेश बोरकर जि.प.प्रमुख,अरविंद भुते जि.प.प्रमुख,राजेश घिये जि.प.प्रमुख,विलासजी दोनोडे,आनंद कोरे,ईश्वरजी मेश्राम माजी सभापती,ईश्वरजी कामडी , रामदासजी, बहेकर, हेमंत नन्नावरे तथा सर्व आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि जनतेनी आपली उपस्थिती दर्शविली.
0 comments:
Post a Comment