Ads

विविध दुचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना भद्रावती पोलिसांनी केली अटक

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेखCrime News भद्रावती शहरात हँडल लाॅख नसलेल्या दुचाकी चोरून त्यांचे चेसिस नंबर वर दुसरा नंबर टाकून गाडीचे स्पेअर पार्ट विकणाऱ्या टोळीला भद्रावती पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे 4 अट्टल आरोपींना अटक करण्यात आली असून एकूण 1, 25,000/- हजार रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.Bhadravati police arrested the accused in various two-wheeler theft crimes
भद्रावती शहरात दुचाकी वाहन चोरीचे प्रकरण वाढत असतांना भद्रावती पोलिसांनी गस्त वाढवत गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेत पोलीस खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता आरोपींनी वाहन चोरीच्या गुन्ह्याची कबूल दिली.

कुणाल हरिदास चुके वय 21 वर्ष, रा. शिवाजीनगर, यश संजय कामतवार वय 19 वर्षे, रा. विजासन, राहुल नागोबा बावणे वय 21 वर्ष, रा. बंगाली कॅम्प व प्रवीण बंडू मांढरे वय 23 वर्ष रा. विजासन सर्व राहणार भद्रावती शहर यांना अटक करण्यात आली.

चोरी केलेली वाहने सहज विक्री करता यावी, यासाठी आरोपींनी के.टी.एम.DUKE ( डूके ) मोटरसायकल व स्प्लेंडर मोटरसायकलचे स्पेअर पार्ट वेगळे करून काही गाड्यांचे इंजन क्रमांक व चेसेस क्रमांक ग्राइंडरने खोडून,  त्यावर लोखंडी पंचिंग शिक्यानी दुसरे इंजिन क्रमांक व चेसिस क्रमांक बदल्याचे आढळले त्यावरून ग्राइंडर मशीन व लोखंडी पंचिंग सिक्के जप्त करण्यात आले तसेच दोन चाके वाहन व दुचाकी वाहनाचे इतर सामग्री असे एकूण 1,25,000/-  रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी, भद्रावती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांचा मार्गदर्शनात सपोनि वर्मा, सापोनि विशाल मुळे, पोलीस अमलदार अनुप आषटउंनकर,  विश्वनाथ चुदरी, जगदीश झाडे, निकेश ढेंगे यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment