Ads

माजी गृहमंत्री अनील देशमुख यांची भद्रावती ला भेट,भद्रनाग स्वामींचे घेतले दर्शन.

जावेद शेख भद्रावती प्रतिनिधी :- राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनील देशमुख यांनी भद्रावती शहराला दिनांक 12 रोज बुधवारला भेट दिली. यावेळी त्यांनी शहरातील सुप्रसिद्ध भद्रनाग स्वामी मंदिरात भेट देऊन भद्रनाग स्वामींचे दर्शन घेतले. Former Home Minister Anil Deshmukh visited Bhadravati, visited Bhadranag Swami.
त्यांच्या भद्रावती येथील आगमनाच्या निमीत्याने त्यांचे भद्रावती तालुका तथा शहर राष्ट्रवादी कांग्रेसतर्फे भद्रनाग मंदिराच्या प्रांगणात फटाक्यांच्या आतिषबाजीत व बैंडच्या गजरात स्वागत करण्यात आले.
यावेळी भद्रनाग मंदिर समिती व भद्रनाग युथ फाऊंडेशनच्या वतिने अनील देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदेश प्रतिनिधी तथा युवा नेते मुनाज शेख,तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर,विलास नेरकर,भद्रनाग युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष फय्याज शेख,सुनील महाले,प्रा. राजेंद्र ताजने,रोशन कोमरेड्डीवार,अमोल बडगे,अजय कावळे,प्रमोद वावरे,राकेश किनेकर,ओमकार पांडे,नागमंदिर समितीचे विश्वस्त योगेश पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. 16 एप्रिलला नागपूर येथे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.या महासभेच्या संदर्भात चंद्रपूर येथे आयोजित एका बैठकीला ते जात असता त्यांनी भद्रावती शहराला भेट दिली.यावेळी त्यांचे सोबत प्रविण कुंटे पाटील, ईश्वर बाळबुधे,जावेदभाई हबीब व जानबाजी मस्के होते.या भेटीदरम्यान अनील देशमुख यांनी शहर तथा तालुक्यातील राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांशी संवाद साधुन मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी शहर तथा तालुक्यात राष्ट्रवादी पार्टिची नवी सदस्य नोंदणी करण्याचे निर्देश दिले व 16 एप्रिलला नागपूर येथील महाविकास आघाडीतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या वज्रमूठ Vajramooth General Assemblyमहासभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण केले.त्यानंतर त्यांनी चंद्रपूर कडे प्रस्थान केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment