चंद्रपर:- रेशन दुकानात धान्य वितरणात अनियमितता झाल्यामुळे पुरवठा विभागाने तक्रार दाखल केल्यानंतर रेशन दुकानदार चंदू बागले यांच्यावर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी तसेच न्यायालयाने दिलेल्या हजर राहण्याच्या अटी व शर्तींमध्ये शिथिलता मिळावी यासाठी आरोपी बागले याने लोकसेवक सह.पोलीस निरीक्षक व तक्रारदार यांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचून आरोपी चंदू बागले याला रंगेहात पकडण्यात आले.Bribing the police cost him expensive
आरोपी चंदू बागले याने लोकसेवक सहाय्यक पोलीस निरीक्षकाला १० हजार रुपयांचे आमिष दाखवले होते. परंतु पोलीस निरीक्षकांनी ते स्वीकारण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाने सापळा रचून आरोपी चंदू बागले याला रंगेहात पकडले.
ही कारवाई नागपूरचे लाचलुचपत प्रतिबंधक पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक मधुकर गीते, अविनाश भामरे, प्रभारी पोलिस उपअधीक्षक शिल्पा भारदे, जितेंद्र गुरनूले, रमेश दुपारे, अरुण हटवार, रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, डॉ. रवीन ढेंगळे, राकेश जांभुळकर, अमोल सिडाम., वैभव गाडगे, मेघा मोहुर्ले, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम. जितेंद्र गुरनूले अधिक तपास करत आहेत.
0 comments:
Post a Comment