Ads

विज पडून इसमाचा मृत्यू

(प्रशांत गेडाम)ब्रम्हपुरी - तालुक्यातील धानोलीपोहा चक येथे विज पडून इसमाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना आज दिनांक :२२ एप्रिल २०२३ ला ५:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. श्री. नवलाजी बळीजी लडके वय अंदाजे ४० असे वीज पडुन दुर्दैवी मृत्यु झालेल्या इसमाच नाव आहे.man's death due to lightning

सविस्तर वृत्त असे आहे की मृतक नवलाजी हे गावातील लोकांनी दिलेल्या माहिती नुसार घरच्या म्हशी राखायला गेला असल्याने चार पाच दिवसापासून तालुक्यातच नाही तर विदर्भात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाने हजेरी लावली असुन आज सुद्धा अवकाळी पावसाने विजांच्या कडडाटासह हजेरी लावली त्या मध्ये म्हशी चारत असतांना नवलाजी च्या अंगावर विज पडून नवलाजीचा मृत्यु झाला. मृतक नवलाजीच्या पच्छात्य आई पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे. नवलाजी अत्यंत मनमिळावू स्वभावाचा व कुटुंबातील कर्ता इसम असुन त्याच्या जाण्याने लड़के कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment