Ads

शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या भरोशावर बाजारसमितीवर झेंडा फडकवू :आ.प्रतिभाताई धानोरकर.

भद्रावती जावेद शेख तालुका प्रतिनिधी:-गेल्या पाच वर्षांपासून भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमची सत्ता आहे.या काळात शेतकरी, व्यापारी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणीक प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे मतदारांचा विश्वास आमच्यावर कायम आहे.या निवडणुकीतही या विश्वासाच्या भरोशावर कांग्रेसप्रणीत शेतकरी विकास पैनल आपला झेंडा भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर फडकवेल असा विश्वास आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केला.We will hoist the flag on the agriculture Market committee on the trust of the farmers: Mla. Pratibhatai Dhanorkar.
शहरातील प्रसिध्द गवराळा गणेश मंदिरात आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते नारळ फोडून भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत कांग्रेसप्रणीत शेतकरी विकास पैनलच्या प्रचाराची सुरुवात करण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर, कांग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत काळे,शहर अध्यक्ष सुरज गावंडे,सुधीर मुडेवार, सरपंच नयन जांभुले,,प्रशांत झाडे,प्रमोद नागोसे,लिमेश माणुसमारे, प्रविण बांदुरकर,अजीत फाळके,अशोक येरगुडे राकेश शिन्डे, डोंगे ,आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक येत्या 30एप्रील रोजी होऊ घातली आहे.यात कांग्रेसप्रणीत शेतकरी विकास पैनलतर्फे सर्व अठरा जागांवर उमेदवार ऊभे करण्यात आले आहे. भविष्यातही आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या तथा व्यापार त्यांच्या समस्या nसोडविण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहु असे प्रतिपादन यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.यावेळी तालुक्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment