Ads

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा -आ किशोर जोरगेवार

मुंबई :-काल मंगळवारी चंद्रपूरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. या नुकसनीचे पंचनामे करण्याचे आदेश तात्काळ देण्यात यावे, मदत केंद्र सुरु करण्यात यावे, येथील नाल्यांच्या खोलीकरण, रुंदीकरणासाठी निधीची घोषणा करण्यात यावी अशी मागणी आज पावसाळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.Immediately assess damage due to heavy rains - Mla Kishore Jorgewar
मंगळवारी चंद्रपूर शहरात झालेल्या पावसामुळे बाबूपेठ, आंबेडकर नगर, सिस्टर कॉलनी, जलनगर, रय्यतवारी कॉलरी, महाकाली कॉलरी, नानाजी नगर वडगाव, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, वृंदावन नगर, इंडस्ट्रियल वार्ड, नेहरुनगर, उत्तमनगर, सरकारनगर या भागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांच्या घरातील अन्नधान्य पाण्याने खराब झाले आहे. तर अनेक भागात घरांची पडझड झाली आहे. या सर्व परिस्थितीची आमदार जोरगेवार यांनी माहिती घेतली असून अश्या भागांची पाहणी करुन बेघर झालेल्या नागरिकांच्या राहण्याची तात्काळ व्यवस्था करा अशा सूचना त्यांनी मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना केल्या होत्या.
दरम्यान आज पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरलेले आहे. घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ जिल्हाधिकारी यांना पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, लोकांना मदत केंद्रात नेण्यात यावे अशी मागणी केली आहे. सोबतच शहरातील अनेक नाले निमुळते झाले असल्यानेही नाल्यातील पाणी नागरी वस्तीत शिरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी निधीची घोषणा करण्याची मागणीही यावेळी बोलताना त्यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment