Ads

विशेष मोहीम: मतदार यादी तपासणीसाठी केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) देणार घरोघरी भेट ; नागरिकांनी सहकार्य करावे

भद्रावती तालुका प्रतिनिधी : 1 जानेवारी, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाचे दिनांक 29 मे 2023 पत्रानुसार जाहीर करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने दिनांक 10 जुलै 2023 रोजी वरोरा उपविभागातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले आहे.Special Campaign: Door-to-door visits by Central Level Officer (BLO) for voter list verification; Citizens should cooperate
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेव्दारे दिनांक 21 जुलै 2023 ते 21 ऑगष्ट 2023 दरम्यान प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन नविन मतदार, मय्यत झालेले मतदार, मतदार यादीतील नोंद दुरुस्ती तसेच मतदार यादीतील / मतदार ओळखपत्रातील त्रुटी दूर करणे करीता, त्रुटी तपासुन नमुना अर्ज, 6, नमुना अर्ज 7, नमुना अर्ज 8, भरुन घेतील

दिनांक 22 ऑगष्ट 2023 ते 29 सप्टेंबर 2023 पर्यंत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणार आहेत. तसेच दिनांक 17 ऑक्टोबर 2023 पर्यत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रत्येक मतदान केंद्रावर दावे व हरकती स्विकारणार आहेत.

याबाबत मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वरोरा, तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार भद्रावती यांनी सर्व मतदारांना आव्हान करुन केंद्रस्तरीय अधिकारी यांना नविन मतदार नाव नोंदणी करणे, मय्यत मतदाराचे नाव कमी करणेकरीता सहकार्य करण्यास विनंती केलेली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment