Ads

रोटरी क्लब भद्रावतीचा पदग्रहण समारंभ संपन्न

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-
रोटरी क्लब भद्रावती चा नववा पदग्रहण समारंभ स्थानिक सेलिब्रेशन सभागृहात नुकताच पार पडला. 2023-24 वर्षासाठी रोटरी क्लब भद्रावतीच्या नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रोटेरियन अनिल धानोरकर, सचिवपदी सुधीर पारधी तर कोषाध्यक्षपदी विक्रांत बिसेन यांची निवड करण्यात आली . Induction ceremony of Rotary Club Bhadravati concluded
Anil Dhanorkar as President, Sudhir Pardhi as Secretary
पदग्रहण समारंभाच्या अध्यक्षपदी असिस्टंट गव्हर्नर 3030 रमा गर्ग, प्रमुख अतिथी म्हणून असिस्टंट गव्हर्नर नितेश जयस्वाल, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉक्टर बी .प्रेमचंद , डिस्ट्रिक्ट ग्रीटिंग चेअर 3030 भाविक तेलंग,रोटरी क्लब भद्रावतीचे नूतन अध्यक्ष अनिल धानोरकर, सचिव सुधीर पारधी, कोषाध्यक्ष विक्रांत बीसेन तसेच रोटरी क्लब भद्रावतीच्या मावळत्या अध्यक्ष डॉक्टर माला प्रेमचंद, इनरव्हील क्लब अध्यक्ष स्वाती चारी, सचिव प्रेमा पोटदुखे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

याप्रसंगी मावळत्या अध्यक्ष डॉक्टर मला प्रेमचंद यांच्याकडून नूतन अध्यक्ष अनिल धानोरकर यांना रोटरीची अध्यक्षीय कॉलर सोपविण्यात आली व अनिल धानोरकर यांच्याकडून ती कॉलर स्वीकारण्यात आली.
तसेच सचिवपदाची रोटरी कॉलर सुधीर पारधी व कोषाध्यक्ष पदाची रोटरी कॉलर विक्रांत बिसेन यांना सोपविण्यात आली.

पदग्रहण समारंभ प्रसंगी सात नवीन सदस्यांनी रोटरी क्लब भद्रावती मध्ये प्रवेश घेतला. यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. मागील वर्षीच्या कार्याबद्दल प्रभावीत होऊन मावळत्या अध्यक्षा डॉक्टर माला प्रेमचंद यांनी रोटरी क्लब भद्रावतीच्या सर्वच रोटेरियनसचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. युवा आदित्य पिंपळकरचा विशेष सत्कार करण्यात आला.

अध्यक्ष भाषणातून रमा गर्ग यांनी रोटरी क्लबच्या कामाविषयी माहिती दिली. डॉक्टर बी. प्रेमचंद यांनी आजच्या युवा वर्गाला मार्गदर्शन करण्यासाठी प्रोजेक्ट राबविण्यात यावे असे आवाहन केले. नूतन अध्यक्ष अनिल धानोरकर यांनी त्यांच्या कार्यकाळात घेण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट्स बाबत माहिती दिली. मावळत्या अध्यक्षा माला प्रेमचंद यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या प्रोजेक्ट बाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालक सचिन सरपटवार ,प्रास्ताविक आत्माराम देशमुख तर आभार सुधीर पारोधी यांनी मानले.

या संपूर्ण कार्यक्रमात रोटेरियन अब्बास आजानी, विवेक आकोजवार ,प्रकाश पिंपळकर, रुकसाना शेख, डॉक्टर अमित प्रेमचंद ,किशोर खंडाळकर, विनोद कामडी, भावीक तेलंग, सुनील पोटदुखे, अविनाश सिद्धमशेट्टीवार, सेहनील अजाणी, प्रवीण महाजन, कीर्ती गोहने, हनुमान घोटेकर, वंदना धानोरकर, चंद्रकांत खारकर, सुधीर मुडेवार, एड, युवराज धानोरकर ,आनंद क्षीरसागर, चंपत आस्वले, वासुदेव ठाकरे, महेंद्र गावंडे, संजय बोरकुटे, दिलीप राम, किशोर पत्तीवार, गिरीश पवार, तुषार सातपुते, ज्ञानेश्वर हटवार, सुरेंद्र राऊत, यांचे सहकार्य लाभले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment