भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:भद्रावती- तेलवासा या रस्त्यावरील रेल्वे बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्याला नदीचे स्वरूप आले असून बोगद्यात छातीवर पाणी असल्यामुळे या मार्गावरील तेलवासा, ढोरवासा, चिरादेवी, पिपरी, घोनाड व कोची या गावचा मार्ग बंद झाला असून या गावातील गावकऱ्यांना ढोरवासा, एकता नगर विजासन या लांबच्या मार्गाने फिरून जावे लागत आहे. परिणामी गावकऱ्यांना त्रास सोसावा लागत आहे. Chiradevi Dhorwasa Pipari road in Bhadravati taluka closed
Six villages lost contact
दरम्यान ढोरवासा येथील भद्रावती येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या बोगद्यातून छाती एवढ्या पाण्यातून जीव मुठीत घेऊन यावे लागले. दरम्यान या बोगद्यात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार पंप लावण्यात आला असला तरी येणारे पाण्याचे लोट जास्त असल्यामुळे व सतत मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाणी बाहेर फेकण्याचे काम संथपणे सुरू आहे. प्रत्येक पावसाळ्यामध्ये या बोगद्यात हीच परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे या मार्गावरील गावकरी त्रस्त झाले असून या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ते करीत आहे. सध्या या सर्व गावातील ढोरवासा, एकता नगर रस्त्याचा अवलंब करीत असले तरी या मार्गावरील नाल्यास पूर आल्यास हा मार्गही बंद झाल्यास या सर्व गावांचा भद्रावती शहराशी संपर्क तुटणार आहे.
0 comments:
Post a Comment