Ads

चंद्रपुर जिल्ह्यातील ०९ ठिकाणी घरफोड्या करणा-या अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेने (L.C.B.) ठोकल्या बेड्या

चंद्रपुर :दिनांक १७/०६/२०२३ रोजी फिर्यादी नामे श्रीकांत सुनिल अधिकारी, रा. वांढरी फाटा, पोलीस स्टेशन पडोली, जि. चंद्रपूर हे आपल्या परीवारासह रात्री जेवन करून समोरील हॉल मध्ये झोपलेले असतांना कोणीतरी अज्ञात चोरट्याने हॉलचा समोरील दरवाजाला कडी लावून बेडरूमच्या खिडकीची ग्रिल वाकवून बेडरूमध्ये प्रवेश करून बेडरूमधील लॉकर उघडून लॉकरमधील सोन्या-चांदीच्या वस्तुंसह १,६४,५००/- रू चा माल व कागदपत्रे चोरून नेल्याच्या फिर्यादीवरून पोस्टे पडोली येथे अप.क्र. १८८ / २०२३ कलम ४५७,३८० भादवि चा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.Local Crime Branch (L.C.B.) Succeeded in tracing the accused burglars at 09 places under different Police Stations in Chandrapur District.
चंद्रपूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीत वाढत्या घरफोड्या पाहता मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे पोस्टे पडोली, रामनगर, चंद्रपुर शहर, भद्रावती परिसरात रवाना होवून वेगवेगळ्या ठिकाणी घरफोड्या झालेल्या ठिकाणांना भेटी देवून गोपनिय बातमीदारांमार्फत माहिती घेतली असता पोस्टे रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी आरोपी असलेला एक इसम आपल्या ताब्यात घरफोडीचे सोन्याचे दागीने स्वतः जवळ बाळगुन विक्री करण्याचे उद्देशाने संशयास्पद स्थितीत रयतवारी चौकात उभा असल्याची माहिती मिळाल्याने सदर इसमास ताब्यात घेवून त्याला पोस्टे पडोली हद्दीतील वांढरी फाटा येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यासंबधाने विचारपूस केली असता आरोपी नामे १) प्रभु सुब्रमन्यम सानिपती व २) राकेश सुब्रमन्यम सानिपती यांनी मिळून चंद्रपुर जिल्ह्यात पोस्टे पडोली येथील वांढरी फाटा येथे तसेच जिल्ह्यातील पोस्टे भद्रावती, पोस्टे दुर्गापुर, पोस्टे वरोरा येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली.

वरील दोन्ही आरोपीतांना ताब्यात घेवून सखोल विचारपूस करून त्यांचेकडून पोस्टे पडोली येथील ०३, पोस्टे दुर्गापुर- ०१, पोस्टे भद्रावती ०२, पोस्टे वरोरा - ०३ येथे झालेले एकुण ०९ गुन्हे उघडकिस आणून - सोन्याचे दागीने व नगदी रोख रक्कम असा एकुण ६,०८,४५०/- रू. चा माल आरोपींकडून जप्त करण्यात आला.

अशा प्रकारे जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनअंतर्गत घरफोडी सारख्या गुन्ह्यांचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधिक्षक रीना जनबंधु, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि., जितेंद्र बोबडे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा. संजय आतकुलवार, स्वामीदास चालेकर, धनराज करकाडे, नापोशि. गजानन नागरे, संतोष येलपुलवार, पोशि. गोपाल अतकुलवार, नितीन रायपुरे, प्रशांत नागोसे, अजय बागेसर तसेच पोस्टे सायबर, चंद्रपुर यांचे सहकार्याने केली असून आरोपींना पुढिल तपासकामी पोलीस स्टेशन, पडोली येथे ताब्यात देण्यात आले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment