चंद्रपूर (ऊर्जानगर):-चातुर्मासाच्या कार्यक्रमात राष्ट्रसंतांनी " झाड झडुले शस्त्र बनेंगे,पत्थर सारे बॉम्ब बनेंगे,भक्त बनेगी सेना, नाव लगेगी किनारे" या भजनाने चिमुरकराच्या मनात क्रांतीची ज्योत पेटविली. १६ ऑगस्ट १९४२ ला प्रचंड उद्रेकासह चिमूर वासियांनी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयावर मुक मोर्चा नेला. इंग्रजाच्या संगिनीला व बंदुकीच्या गोळीला न जुमानता चिमूर वासियांनी चिमुरला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केले. अशा प्रकारे १६,१७ व १८ ऑगस्ट १९४२ असे तीन दिवस इंग्रजाच्या गुलामगिरीतून संपूर्ण स्वतंत्र झालेले देशातील पहिले गाव म्हणजे चिमूर होय.
चिमूर स्वातंत्र्य झाल्याची घोषणा नेताजी सुभाष सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून केली व संपूर्ण जगात चिमूरचे नाव अमर झाले.
Tribute to Chimur Ashti August revolutionaries in urjanagar......
सन 1942 च्या चिमूर आष्टी ऑगस्ट क्रांतीचे जनक वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तथा सदर क्रांतीत समावेश असलेल्या क्रांतिवीरांच्या त्यागाची, बलिदानाची आपल्याला व येणाऱ्या नवीन पिढीला आठवण राहावी त्यांच्या विचारांचे पुनः बीजारोपण व्हावे या हेतूने श्रीगुरुदेव सेवा मंडळ, ऊर्जानगर चंद्रपूरच्या वतीने राष्ट्रसंत आगस्ट क्रांतीपर्व स्मृतिदिन कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्ता पोईनकर अध्यक्षा गुरुदेव सेवा महिला मंडळ ऊर्जानगर या होत्या . उदघाटिका मा.डाँ.भावना भगत कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ चंद्रपूर विज केंद्र, प्रमुख वक्त्या मा वृषाली धर्मापुरीवार ग्रामगीताचार्य चंद्रपूर, सरस्वती धमाणे यांची उपस्थिती होती.
अधिष्ठानाला व वं राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख वक्त्या यांनी स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृतींना उजाळा दिला व महात्मा गांधीजींना लोकांनी संत पदवी दिली इतके श्रेष्ठ त्यांचे चरित्र होते . भारतीय संस्कृती ही श्रेष्ठ आहे ती जोपासली पाहिजे त्याची अस्मिता स्त्रियांनी जपणे हे कर्तव्य आहे असे सांगितले . समाज घडवण्यासाठी तुकडोजी महाराजांनी केलेल्या विविध कार्याचे सखोल विश्लेषण केले. उदघाटीका डाँ भावना भगत यांनी समाजाची प्रगती ही स्रियांच्या प्रगतीवर आहे असे मत यावेळी मांडले व आगस्ट क्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरस्वती धमाणे,शोभना शेख,मंगला कामडे,प्रणिता चव्हाण यांनी क्रांतिकारी महिलावर समयोचित विचार मांडले.
अध्यक्षा मुक्ता पोईनकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामधून ऑगस्ट क्रांतीचे सविस्तर असे वर्णन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा दुर्गे यांनी केले. प्रस्तावणा अर्चना गोहणे महिला सचिव यांनी केली तर आभार सुषमा उगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला मंडळ व सर्व गुरुदेव प्रेमींचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली असे देवराव कोंडेकर यांनी कळविले आहे
0 comments:
Post a Comment