Ads

विकलांग सेवा संस्थेद्वारा सातत्यपूर्वक विधायक उपक्रम-राहुल पावडे अध्यक्ष भाजपा महानगर चंद्रपूर

चंद्रपूर -अमेरिकेतील वास्तव्यास असलेल्या सौं शिल्पा तगलपल्लेवार द्वारा दिलेल्या दोन शिवणयंत्राचा उपयोग निश्चितच कुटुंब सावरण्यासाठी होईल असा आशावाद भाजपा महानगर अध्यक्ष व माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री राहुल पावडे यांनी लाभार्थी महिलांना शिवणयंत्र व वस्त्रालंकार व पुष्पगुच्छ देताना व्यक्त केला तसेच भविष्यात स्वयंरोजगार हाच कुटुंबाचा आधार असणार आहे असेही त्यांनी आपले मत व्यक्त केले ते पुढे असेही म्हणालेत की गेल्या दोन दशकापासून विकलांग सेवा संस्थेचे सातत्य पूर्वक विधायक व जनहितार्थ उपक्रम कौतुकास्पद आहेत.Continuous constructive activities by the Disability Service Organization -Rahul Pavde President BJP Mahanagara Chandrapur
संस्थेला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या नितेश राव व अमोल कातकर यांचा याप्रसंगी भेटवस्तु व पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता सत्कार करण्यात आला तसेच चंद्रपूरातील दोन भगिनींनी शिवणयंत्र उपलब्ध करुन दिल्याबद्दल शिल्पा तगलपल्लेवार कुटुंबियांबद्दल आभार मानलेत व सौं शिल्पा मॅडम यांचे दीर्घायुष्य अभिष्टचिंतन करण्यात आले.
कार्यक्रमाला आकाशवाणी कलावंत व महाराष्ट्रभर प्रबोधन गीतगायन कला सादर करणाऱ्या अश्विनी खोब्रागडे, देवराव कोंडेकर, अमोल कातकर, पंचकर्म चिकित्सक सीमा वनकर, नंदा बिहाडे, प्रसाद पा न्हेरकर इत्यादीची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रम यशस्वीततेसाठी प्रसाद पान्हेरकर, अशोक खाडे ,संजय डाखोरे, पूजा चहारे ,लता पुनवटकर, रिया सोनुले, कल्याणी घुगल, वैष्णवी कोरडे, शिवानी बोबडे यांनी सहकार्य दिले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment