सोलापूर प्रतिनिधी : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी सुरज नागेश उर्फ नागनाथ मते (रा. चिखली ता. मोहोळ) यास विशेष न्यायाधीश मा. के. डी. शिरभाते यांनी जामीन मंजूर केला.Bail granted to accused under POCSO Act
यात हकीकत अशी की अल्पवयीन मुलगी ही दिनांक 22/7/2023 रोजी घरातून कॉलेजला म्हणून गेल्यानंतर त्या ठिकाणी आरोपी याने अल्पवयीन मुलीस मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्या सोबतच लग्न करणार आहे याचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला वगैरे अशा आशयाची फिर्याद भा.दं. वि. 376(2)(N),363,366(A) व पोक्सो कलम 4,6,8 व 12 कायद्यान्वये मोहोळ पोलीस ठाण्यात नोंद झाल्यावर , पोलिसांनी आरोपीस अटक केली होती. त्यामुळे आरोपींनी जामीन साठी सोलापूर विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती .सदर प्रकरणातील वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशानी आरोपीचा पहिलाच जामीन अर्ज मंजूर केला. यात आरोपीतर्फे अॅड कदीर औटी, अॅड दत्तात्रय कापूरे यांनी काम पाहिले .
0 comments:
Post a Comment