Ads

37 वर्षीय नराधमांने केला 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

भद्रावती.जावेद शेख तालुका प्रतिनिधी:-भद्रावती तालुक्यातील एका गावात एक 14 वर्षी अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधून तिचा विनयभंग केल्याची घटनाएका सदतीस वर्षे इसमाने केल्याची घटना उघडकीस आली आहे.37-year-Man molested 14-year-old minor girl

या प्रकाराच्या तक्रारीनंतर आरोपी महेश तुराणकर, वय 37 वर्ष राहणार ओंकार लेआउट, भद्रावती याला भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीची त्या गावात पाळीव जनावर असल्यामुळे तो नेहमी त्या गावात जात येत होता. त्यामुळे तो गावातील सर्वांच्या परिचित होता. घटनेच्या दिवशी सदर आरोपी त्या गावात गेला. सदर मुलगी हि घरात एकटी होती, ही संधी साधून त्याने तिचा विनयभंग केला. घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात देण्यात आल्यानंतर भद्रावती पोलिसांनी सदर आरोपीवर संबंधित गुन्हे दाखल करून त्याला अटक केली आहे. सदर घटनेचा तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार बिपिन इंगळे यांचेमार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राहुल किटे तपास करीत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment