चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने By Maharashtra Pradesh Congress Committee राज्यभरात जनसंवाद यात्रा Jansamvad Yatra काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि चंद्रपूर काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर शहरातील सर्व प्रभागात जनसंवाद यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. रविवारी ३ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता माता महाकाला मंदिर देवस्थान येथून यात्रेला प्रारंभ होणार आहे. या यात्रेचा समारोप १२ सप्टेंबरला होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र सरकारचे विविध पातळ्यांवरील अपयश जनतेसमोर आणण्यात येणार आहे.
Congress Jansamvad Yatra in Chandrapur from Sunday
यात्रेत विधानसभेचे विरोधी पक्षनते विजयभाऊ वडेट्टीवार, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुभाषभाऊ धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, विनोद दत्तात्रय, के. के. सिंग, सुभाषसिंग गौर, सेवादलचे अध्यक्ष सूर्यकांत खनके, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी सहभागी होणार आहेत.
देशातील जनतेला खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारने संविधानानुसार शासन न करता मनमर्जीनुसार सुरू केला आहे. मागील ९ वर्षांत देशाची सर्वच क्षेत्रात अधोगती झाली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याचा वारंवार प्रयत्न केला जात आहे. जातीय दंगली घडविल्या जात आहेत. महिलांची विवस्त्र धिंड काढली जात असताना पंतप्रधान गप्प आहेत. राज्यात बेईमानी आणि ५० खोक्यातून तयार झालेल्या राज्य शासनाला जनतेशी काहीही देणेघेणे नाही. त्यामुळे शेतकरी, कामगार, तरुण, महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतकऱ्यांची क्रुर थट्टा चालविली जात आहे. नोकरभरतीच्या नावावर बेरोजगार तरुणांकडून लूट सुरू आहे. शेतकऱ्यांना १२ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या काळात ८ तास वीजही मिळत नाही. वीजेचे दर वाढवून जनतेची लूट केली जात आहे. सरकारी संस्था विकण्याचा घाट घातला जात आहे. ओबीसींची जनगणना करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. चंद्रपुरातील बाबुपेठ उड्डाणपूल अर्धवटस्थितीत आहे. अमृत योजना पाच वर्षांनंतरही अपूर्ण आहे. जिल्ह्यात एकही नवीन उद्योग सुरू करण्यात आलेला नाही यासह अन्य विषय जनतेसमोर मांडण्यात येणार आहेत.
या यात्रेत काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.
प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले होणार सहभागी
चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील सर्व प्रभागात जनसंवाद यात्रा काढण्यात येणार आहे. ३ सप्टेंबरपासून सुरू होणारी ही यात्रा १२ सप्टेंबरपर्यंत राहणार आहे. ५ सप्टेंबरला सकाळी ६ वाजता तुकुम प्रभागातील मातोश्री विद्यालय येथून सुरू होणाऱ्या यात्रेत प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले सहभागी होणार आहेत. यावेळी नानाभाऊ पटोले स्वता चंद्रपुरातील जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता गांधी चौकात जाहीर सभा होणार आहे. यावेळी काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment