Ads

अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेकडुन अटक

चंद्रपुर :-मा. पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा मार्फत अवैध अंमली पदार्थ दारू, शस्त्रे, जुगार पैसे यांचे विरोधात राबविलेल्या विशेष मोहीमे दरम्यान दिनांक 30/10/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय चंद्रपूर येथे उपस्थित असांना गुप्त बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, दोन इसम खाजगी कारने नागपुर वरून एम. डी. ड्रग्ज पॉवडर विकी करीता सोबत बाळगुन पडोली चौक येथे येणार आहे. Arrested by the local crime branch of persistent drug traffickers
सदर माहिती वरीष्ठांना देवुन सदर माहिती वरून पोलीस स्टेशन पडोली हददीत थांबुन असतांना एक चार चाकी वाहन ज्याचा क्रमांक एमएच-34- बीआर-5951 ही नागपुर कडुन चंद्रपूरच्या दिशेने येतांना दिसली. सदर चारचाकी वाहनास थांबवुन झडती घेतली असता, ड्रायव्हरचे सिटचे बाजुला बसलेला इसम नामे शाहरूख मतलब खान वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस यांचे हातातील थैलीमध्ये पांढऱ्या भुरकट रंगाचे पॉवडर M. D. (मॅफेड्रान) वजन 198 ग्राम किंमत 19,80,000/- रू तसेच त्याचे ताब्यातील कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक लोखंडी तलवार किंमत अंदाजे 500 /- रू मिळुन आले.

सदर कार्यवाही दरम्यान दोन्ही आरोपी नामे 1) शाहरूख मतलब खान वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर 2) साहील ईजराइल शेख वय 28 वर्ष रा. शालीकग्राम नगर घुग्घुस ता. जि. चंद्रपूर यांचे ताब्यातून 1) 198 ग्राम एमडी पॉवडर किंमत 19,80,000/- रू 2 ) दोन नग विव्हो कंपनीची मोबाईल किंमत 20,000/- रू 3) एक बलेनो कार एमएच-34- डीआर-5951 किंमत 8,00,000/- रू4) आरोपीचे अंग झडतीत नगदी 2200 /- रू5) एक लोखंडी तलवार किंमत 500/- रू असा एकुण 28,02,700 /- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला. सदर दोन्ही आरोपींनी अटक करून पो स्टे पडोली अप क्र. 319 / 2023 कलम 8 (क), 21 (क) गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 सकलम 4, 25 भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये करण्यात आला. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा येथील सपोनि नागेश चतरकर हे करीत आहे. गुन्हा नोंद

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक, चंद्रपूर श्री. रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर श्रीमती रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. महेश कोंडावार सपोनि नागेश चतरकर, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि अतुल कावळे, पोहवा धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, भुषण 'बारसिंगे तसेच पो. स्टे. सायबर चे छगन जांभुळे, अमोल सावे, प्रशांत लारोकर यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment