Ads

राष्ट्रीय सिलंबन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भद्रावतितील सहा खेळाडूंची निवड.

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-ऑल इंडिया सिलंबन फेडरेशन व तामिळनाडू स्टेट सिलंबन असोसिएशन All India Silamban Federation and Tamil Nadu State Silamban Association यांच्या संयुक्त विद्यमाने तामिळनाडू राज्यातील कुडालोर येथील सेंट जोसेफ सायन्स कॉलेज येथे पाच ते आठ आक्टोबर दरम्यान राष्ट्रीय सीलंबन चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात भद्रावती येथील क्रिश भोयर 19 वर्षे वयोगट, दीक्षांत रामटेके बारा वर्षे वयोगट, अथर्व पातसे अकरा वर्षे वयोगट, सौर्या रामटेके 15 वर्षे वयोगट, दिव्या गेडाम 18 वर्षे वयोगट व तनु आडे 19 वर्षे वयोगट या सहा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र सिलंबन स्पोर्ट्स असोसिएशन पुणे चे अध्यक्ष मास्टर संजय बनसोड यांच्यातर्फे ही निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंचे ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक वाल्मीक खोब्रागडे, जिल्हा प्रशिक्षक प्राध्यापक दुश्यंत नगराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठीकरे आदींनी अभिनंदन केले असून त्यांना या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment