Ads

भावसुनेने हडपली परस्पर जमीन

चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील चिकणी येथे असलेली वडिलोपर्जित शेतजमिन भावसुनेने परस्पर हडपली असून, कोणतीही भनक लागू न देता सातबाऱ्यावरून आपले नाव कमी केल्याचा आरोप वृद्ध शेतकरी शंकर झिबल मेश्राम यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.Mutual land usurped by brother's daughter inlaw
शंकर मेश्राम यांनी चिकणी येथे वडिलोपर्जित जमीन असून, या जमिनीवरील सातबाऱ्यावर वडिलांच्या मृत्यूनंतर शंकर झिबल मेश्राम व भाऊ महादेव झिबल मेश्राम यांची नावे होती. शंकर मेश्राम यांना दोन्ही मुलीच असल्याने ते मागील अनेक वर्षांपासून गाव सोडून चंद्रपूर येथे मुलगी लता आत्राम यांच्याकडे वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे शेतकीडे दुर्लक्ष झाले होते. याच संधीचा फायदा घेत महादेव मेश्राम यांची पत्नी सुमन महादेव मेश्राम हिने काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून सातबाऱ्यावरून झिबल मेश्राम यांचे नाव कमी करून संपूर्ण जमीन हडपली. काही कामानिमित्त ते गावाला गेल्यानंतर ते शेतात गेले असता त्यांच्या शेतात त्यांच्या परवानगीविनाच ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विहिरीचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे त्यांनी अधिक चौकशी केली असता या जमिनीवरून त्यांचे नावच कमी करण्यात आल्याचे उजेडात आले. यानंतर वरोरा पोलीस ठाणे, स्थानिक तहसीलदार यांच्याकडे तक्रार करीत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. मात्र, कुठेही यश आले नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी यांनी वरोरा येथील अधिकाऱ्यांकडे प्रकरण पाठविले. यावेळी वरोरा येथील काही अधिकाऱ्यांनी आपल्यालाच दमदाटी केल्याचा आरोप शंकर मेश्राम यांनी केला आहे.
शेतात विहिरीचे काम करताना ग्रामपंचायत सचिव वांढरे, सरपंच वेणु उरकुडे, उपसरपंच किशोर बोधे, बंडू डाहुले आदींनी बोगस स्टॅम्पपेपर तयार करून शेतात विहिरीचे बांधकाम केल्याचा आरोपही झिबल मेश्राम यांनी केला आहे. जमीन परत मिळवून देण्यासह अनधिकृतपणे जमीन बळकावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शंकर झिबल मेश्राम, त्यांची मुलगी लता रामचंद्र आत्राम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment