Ads

बुद्ध मुर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात पोलिसांना अपयश

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-ऐतिहासिक विज्जासन बुध्द लेणी येथील बुध्द मुर्तीची तोडफोड करुन विटंबाना करण्यात आली. या घृणास्पद कृत्याचा आरोपी अजुन पकडल्या गेला नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस प्रशासन अपयशी ठरलेले दिसुन येत आहे .
Police failed to arrest the accused who desecrated the Buddha statue
याविषयी विचारविनीमय करुन पुढील दिशा ठराविण्या करीता भिक्खु संघ , उपासक - उपासिका व बौध्द अनुयायांची बैठक ऐतिहासिक विज्जासन बुध्द लेणी भद्रावती येथे पार पडली . बैठकित या घृणास्पद कृत्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. अशा प्रकारच्या घृणीत मानसिकतेबाबत जिल्हाभर जनप्रबोधन करण्यात यावे असा सुरही व्यक्त करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी भन्ते सुमन वण्णो महास्थवीर चंद्रपुर हे होते . उपस्थितांना भन्ते सच्चक महास्थवीर , भन्ते धम्मप्रकाश , यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीचे आयोजन बुध्दलेणी सिक्युरिटी अॕक्शन कमिटी जिल्हा चंद्रपुर (महाराष्ट्र ) द्वारा करण्यात आले होते .
सदर बैठकीत बुध्द मुर्ती तोड फोड प्रकरण , तद्नंतर उद्भवलेली परीस्थिती , बुध्द मुर्तीची पुनर्स्थापना , आरोपीच्या शोधाबाबतची स्थानिक पोलीस प्रशासनाची भुमीका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक बौध्द स्थळांची सुरक्षा , बुध्द - बाबासाहेबांच्या मुर्ती तोडफोडी ची मानसिकता , त्यावर आंबेडकरी - बौध्द समाजाची भुमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत हरिशभाई दुर्योधन , सुरेन्द रायपुरे , बंडुभाऊ लभाने , कोमल रामटेके , शैलेश शेंडे , अॕड. प्रशांत रामटेके , प्रा. रविंद्र पाटील , अशोक उमरे , नाना देवगडे , सिध्दार्थ सुमन , उमेश रामटेके , मिलिंद शेंडे , गिताबाई वाळके , राहुल कळसकर , इत्यादींनी आपले विचार व्यक्त केले. संचालन संतोषभाई रामटेके यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment