Ads

आदर्श शाळेत चिंतन दिन निमित्त स्वच्छता प्रकल्प संपन्न.Cleanliness project completed on the occasion of Chintan Day in Adarsh ​​School.

राजुरा 22 फेब्रुवारी:-बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील स्काऊट्स -गाईड्स युनिटच्या वतीने या चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडेन पॉवेल यांचा जन्मदिन चिंतन दिन म्हणून साजरा केला. 
Cleanliness project completed on the occasion of Chintan Day in Adarsh ​​School.
यावेळी चंद्रपूर भारत स्काऊट्स-गाईड्स कार्यालया मार्फत केलेल्या मार्गदर्शक सूचने नुसार स्वच्छता प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शालेय परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.  प्लास्टिक कचरा होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्करराव येसेकर, सचिव बा.शी.प्र. मं., हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून आदर्श मराठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख तथा छ.शिवाजी महाराज स्काऊट युनिट मास्तर बादल बेले यांची उपस्थिती होती.
भास्करराव येसेकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्काऊट गाईड चळवळीने विद्यार्थ्यांचा  सर्वांगीण विकास साधत असतांनाच त्यांच्या अंगी देशप्रेम, स्वावलंबन, सेवाभाव, विश्वबंधुत्व ,समानता या गुणांचा विकास होतो. मुख्याध्यापिका नलीनी पिंगे व बादल बेले यांनीही यथोचित मार्गदर्शन केले. चिंतन दिनानिमित्त विश्वरत्न धोटे या विद्यार्थ्यांने लॉर्ड बेडेन पॉवेल यांच्या चरित्र व कार्याच्या माहितीचे वाचन केले. तसेच स्काऊट-गाईड च्या विध्यार्थीनी स्वच्छता अभियान राबविण्यात सहकार्य केले. यावेळी शिक्षिका ज्योती कल्लूरवार, वैशाली टिपले, जयश्री धोटे, सुनीता कोरडे , अर्चना मारोटकर,  वैशाली चिमूरकर, स्वीटी सातपुते, माधुरी रणदिवे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छ.संभाजी महाराज स्काऊट युनिट लीडर रुपेश चिडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिजामाता गाईड युनिट च्या युनिट लीडर रोशनी कांबळे यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment