Ads

सेवानिवृत्तीनंतरचे जीवन कुटुंबासोबत आनंदाने घालवा: खाण प्रबंधक अनिल बोरडे.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख:-आपल्या नोकरीच्या कर्तव्यावर असताना कामगार हा आपल्या कंपनीच्या उत्कर्षाबद्दल सतत विचार करीत असतो. यादरम्यान कामाच्या व्यापामुळे आपल्या कुटुंबाकडे काहीसे दुर्लक्ष होत असते. मात्र आता आपण सेवानुत्र निवृत्त झाला आहात, त्यामुळे सर्व चिंता सोडून आपला पुढील काळ कुटुंबांसोबत आनंदाने घालवा व चिंतामुक्त जीवन जगा असे आवाहन खान प्रबंधक अनिल बोरडे यांनी सेवानिवृत्त कामगारांना केले.
Enjoy post-retirement life with family: Mine manager Anil Borde.
वेकोली घुगुस क्षेत्राच्या बेलोरा नायगाव खाणीत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांच्या निरोप तथा सत्कार संबंधाचे आयोजन करण्यात आले. त्यात ते बोलत होते. यावेळी बेलोरा नायगाव खाणीचे खान प्रबंधक अनिल बोरडे, सेलवन साहेब, संजय काळमेघ, प्रशांत पाचपोर,कामगार नेते दीपक जयस्वाल,श्रीकांत माहुलकर,मनोज बिट्टुरवार, राजकुमार निशाद, अरुण मेश्राम, प्रमोद वंजारी ,मनोज चिकाटे, सुमन सिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी खाणीतून सेवानिवृत्त झालेल्या सुंदरसिंग पवार, प्रमोद शेंडे व दिलीप भोसकर या तीन कामगारांना खान प्रबंधक अनिल बोरडे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी तथा कामगार नेत्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे संचालन प्रफुल इखारे यांनी तर आभार नारायण जांभुळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील बिपटे, संकेत खोकले प्रज्ञावंत लोणारे, प्रशांत डोहे, राजू खोके आदींनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment