तालुका प्रतिनिधी जावेद शेख
भद्रावती:-पोलीस स्टेशन माजरी अंतर्गत दिनांक 21/02/2024 रोजी रात्रौ.11/00 वा.दरम्यान मा.एस.डी.पी.ओ.वरोरा साटम मँडम यांना गोपनिय माहिती मिळाली की वर्धा नदीत राळेगावं रिठ घाटावर मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरु आहे.या माहितीच्या आधारे माजरी ठाणेदार सपोनि.योगेश खरसान सोबत पोउपनि. भोजराम लांजेवार ,सफौ.बंडु मोहुर्ले,पोलीस अंमलदार गुरु शिंदे व गजानंद पोले यांच्या टिमने मौजा राळेगाव रिठ येथील वर्धा नदी घाट येथे रेड केली असता वर्धा नदी राळेगाव रेती घाटातून होडी (बोट) मध्ये रेतीचा उपसा करण्याकरीता डिझल इंजिन लाऊन मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे आदेशांचे उल्लंघन करुन चंद्रपूर जिल्ह्याचे हद्दीतून यवतमाळ जिल्ह्याचे हद्दीमध्ये वर्धा नदीचे पात्रात जमा करुन हायवा ट्रकने अवैद्यरित्या रेतीची तस्करी चालू असतांना आढळून आल्याने रेती तस्करीत वापरण्यात आलेले पोकलँन मशीन, टिनाचे पत्र्याची होडी (बोट) ,डिझल इंजिन व लोखंडी पाईप असा एकून ३०,७०,०००/- रुपयाचा मुद्देमाल माजरी पोलीसांनी जप्त केला.
स्वत:चे आर्थित फायद्यासाठी, कट रचुन चोरटया पद्धतीने मोठया प्रमाणात रेतीची जमाखोरी करून जाणिव पूर्वक रेतीचे अवैद्य उत्खनन करुन चोरी केली . तसेच वर्धा नदीचे पात्रातील रेतीची आगळीक केली. नदीचे पिण्यायोग पाणी दुषित करण्यास कारणीभूत झाले तसेच गैरपद्धधीने पाण्याचे दिशेत बदल करुन होडीचा (बोट) वापरुन रेतीचे अवैध उत्खनन केले जात होते.शेतीमध्ये व पिण्याच्या पाण्यामध्ये घट होईल याची जाणीव असतांनासुद्धा नदीच्या पाण्याचे निचरा प्रक्रियेस क्षती पोहचविली .वरुन आरोपी -1)शेख शेहजाद शेख निशाद रा. यवतमाळ, 2)आरीफ अहेमद सिद्दीकी अहेमद रा. यवतमाळ 3) सैय्यद कादर सैय्यद दाऊद रा. यवतमाळ व 4)श्री सैय्यद मन्सूर सैय्यद दाऊद रा.यवतमाळ ईतर दोन ईसमा विरुद्ध दि.22/02/2024 रोजी अप क्र. 19 /2024 कलम ३७९, ४३०,४३१, १०९, १२० (ब),१८८, भादवि सह कलम ४८ (७) (८) महा. जमिन. महसुल. अधिनियम १९६६ अन्वये पोस्टे माजरी येथे गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलिस अधिक्षक चंद्रपूर व मा. एस.डी.पी.ओ.वरोरा यांचे मार्गदर्शनात माजरी ठाणेदार श्री. योगेश खरसान करित आहे.
0 comments:
Post a Comment