Ads

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा स्पर्धेत चंदनखेडा शाळा भद्रावती तालुक्यात प्रथम.

भद्रावती तालुका प्रतिनिधी जावेद शेख :- महाराष्ट्र शासन,शिक्षण विभाग अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात संपुर्ण राज्यात राबविलेली स्पर्धा म्हणजे "मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा"."Chief Minister My School, Beautiful School". या स्पर्धेत भद्रावती पंचायत समिती मधील "जि.प.उच्च प्राथ.शाळा चंदनखेडा" या शाळेने तालुक्यातून प्रथम येण्याचा मान पटकविला. स्पर्धेतील सर्वच निकषात व उपक्रमात उत्स्फुर्त विद्यार्थी सहभाग व त्याची अद्ययावत दस्तऐवजे,लोकसहभाग व स्थानिक सर्व प्रशासनाच्या सहकार्यातून स्थानिक, राष्ट्रीय,सामाजिक ,शैक्षणिक सहभातून सर्व उपक्रम राबविणारी शाळा म्हणुन प्राप्त गुणांकनात सबंध भद्रावती तालुक्यात सर्वोच्च स्थानी राहिली.व प्रथम येण्याचा मान पटकविला
Chandankheda School first in Bhadravati taluk in Chief Minister My School, Beautiful School Competition.
या स्पर्धेत तालुक्यात भरभरुन प्रतिसाद मिळालेला असतांना " भद्रावती तालुक्यातील एकूण १२२ शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धेत सहभागी झाल्या.त्यात जि.प.ऊ.प्रा.शाळा,चंदनखेडा शाळेने यश प्राप्त केले. शाळेच्या यशात येथील उत्तम प्रशासक म्हणुन मुख्याध्यापिका सौ.अनिता आईंचवार यांची भुमीका महत्वाची राहिली.सोबत आठही होतकरु उपक्रशिल शिक्षक,यांचे अथक परिश्रम, गुणवत्तेसाठी सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य या शाळेतून सातत्याने होत आहे.सोबतच या यशात शाळा व्यवस्थापन समिती व अध्यक्ष अनिलजी कोकुडे, ग्रा.पं.चंदनखेडा चे युवा तडफदार सरपंच नयनजी जांभुळे व ग्रा.पं.कमेटी,यांचे सकारात्मक सहकार्यातून शाळेची गुणवत्ता टिकविण्यात शाळा आजवर अग्रस्थानी राहिलेली आहे. या प्राप्त सन्मानासाठी ह्या शाळेचा उत्साही होतकरु शिक्षकवर्ग यांचे सांघीक कार्य हे यशाचे गमक आहे असे म्हटले जात आहे.
चंदनखेडा जि.प.उ.प्रा.शाळा ही शाळास्तर व गावस्तरावरील सर्वच उपक्रमात सहभागी होत असून प्रत्येक होणा-या उपक्रमात सर्व घटकांचे योगदान महत्वाचे राहिलेले आहे.या प्राप्त यशाबद्दल सर्व ग्रामस्थ,पालकवर्ग व पर्यवेक्षकीय यंत्रणा,शिक्षक संघटना,आजी माजी पदाधिकारी,विद्यार्थी यांचेद्वारा समाधान व्यक्त करण्यात येत असून सर्वत्र कौतुक केले जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment