Ads

चंद्रपूरकर खुशबूने पटकावला गोवा फॅशन विकमध्ये रनर अपचा मुकुट

चंद्रपूर : अलीकडेच गोवा येथील सनसिटी रिसॉर्ट येथे मिस फेस ऑफ नेशन गोवा फॅशन विक Miss Face of Nation Goa Fashion Week at Suncity Resort ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत चंद्रपूर येथील खुशबू नळे हिने प्रथम रनर अपचा मुकुट पटकावला आहे. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यातील ६० स्पर्धक सहभागी झाले होते. तिने सर्वांना मागे टाकत रनर अपचा मुकुट पटकावत राष्ट्रीय पातळीवरील सौंदर्यस्पर्धेत चंद्रपूरचे नावलौकीक केले आहे
Chandrapurkar Khushboo bagged the runner up crown at Goa Fashion Week
खुशबू नळे ही सध्या गोंदिया येथे होमिओपॅथीच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत असताना फॅशनचीही आवड तिला बालपणापासून होती. त्यामुळे तिने नागपूर येथे वन डायरेक्शन मॉडेलिंग अकादमीमध्ये फॅशन कोरिओग्राफर इमरान शेख पेजंट कोच पायल शाहू यांच्या मार्गदर्शनात फॅशनचे धडे घेतल्याचे तिने चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. विशेष म्हणजे डॉक्टरकीचे शिक्षण घेत असताना दररविवारी गोंदियाहून नागपूर येथे प्रशिक्षणासाठी जात असल्याचे तिने सांगितले. वडील बंडू नळे, आई वेणू नळे यांनीही या स्पर्धेसाठी नेहमी प्रोत्साहन दिल्याचे तिने सांगितले. पुढे आणखी मोठ्या फॅशन स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवायचे असल्याचे तिने सांगितले. यावेळी तिच्यासोबत तिची आई वेणू नळे यांचीी उपस्थित होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment