Ads

पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हददीमधिल सराईत गुन्हेगाराला जिल्हातुन हद्दपार

चंद्रपुर :-पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर विविध गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला जिल्हातुन हदपार करण्यासाठी चंद्रपुर शहर पोलीसांनी केलेल्या कारवाईला यश आले पोस्टे चंद्रपुर शहर हददीतील सराईत गुन्हेगाराला जिल्हातुन सहा महिण्याच्या कालावधी करीता हद‌पार केले आहे. Deportation of criminals from the district within police station Chandrapur city limits
पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर अतंर्गत पंचशील वार्ड चंद्रपुर रहिवासी सराईत गुन्हेगार शुभम अमर समुद वय २६ वर्ष याच्याविरूध्द पोस्टे चंद्रपुर शहर येथे अवैद्य दारू विकी, भाडण, मारहाण, जबरीने इच्छापुर्वक, धमकि देणे, अशा प्रकाचे ०९ गंभीर गुन्हे दाखल आहेत. नि. ह. इसम शुभम अमर समुद यांचेवर पोलीसांनी वारंवार प्रतिबंधकात्मक कारवाई करून सुध्दा त्याच्या चरीत्र आणी सवयीत कसलीही सुधारणा झाली नाही. उलट तो मगरूर व धाडसी प्रवृत्तीचा असल्याने परिसरातील लोकांच्या मनात दहशत निर्माण हावून कृतीमुळे परीसरातील सार्वजनीक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली होती अश्यात चंद्रपुर शहर पोलीस निरीक्षकांनी त्याला जिल्हा हद्दीतुन हद्दपार करण्याकरीता महाराष्ट्र पोलीस अधि. १९५१ च्या कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वये उप. विभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी चंद्रपुर यांचेकडे मंजुरीस्तव प्रस्ताव सादर केला होता.

मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी विहीत मुदतीत

प्रस्तावाची प्राथमीक चौकशी करून शुभम अमर समुद यास जिहा हद्दीतुन हद्दपार

करण्याची शिफारस केली होती अखेर मा. एस डि एम रणजीत यादव यांनी दि.२१.०२.

२०२४ रोजी आदेश काढुन शुभम समुद यास ०६ महीण्याचा कालावधी करीता

जिल्हयातुन हद्दपार केला आहे. कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन सा. अप्पर

पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम उप-विभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे

मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके नी केली आहे.

हद्दपारीचा कारवायांमुळे गुन्हेगारांत दहशत पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन रूजु झाल्यापासुन त्यांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी थेट हद्दपारच्या कारवाही सुरू केल्या आहेत. यातुनच चंद्रपुर शहर पोलीसांनी शुभम अमर समुद वय २६ वर्ष रा.पंचशिल वार्ड चंद्रपुर याचेवर हद्द‌पारीची कारवाही करून परीसरातील नागरीकांना दिलासा मिळवुन दिला पोलीसांकडुन होत असलेल्या हद्दपारीच्या कारवायांमुळे गुन्हेगारांचे धाबे दनानले असुन गुन्हेगारांनी आपल्या अवैद्य कृत्य व अवैद्य धंद्यापासुन परावृत्त होउन ईतर वैद्य रोजगाराकडे वळावे अन्यथा हद्दपारीच्या कारवाया सुरूच राहतील असे पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी कळविले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment