जावेद शेख भद्रावती तालुका प्रतिनिधी:- दि. १९.०४.२०२४ रोजी रात्रौ २१.४० वा. सुमारास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोउपनि प्रियंका गेडाम यांना मुखबीरकडुन बातमी मिळाली की भद्रावती सुर्यमंदीर वार्ड शिंदे ले आउट भद्रावती येथे बाबाराव पारखी यांचे घरासमोर एक पांढ-या रंगाची टाटा सुमो गाडीमध्ये देशि दारु भरुन उभी आहे.
Action against illegal liquor smugglers in Police Station Bhadravati
अशा खबरेवरुन पोउपनि प्रियंका गेडाम यांनी पोलीस स्टाफचे मदतीने सदर ठिकाणी जावुन टाटा सुमो वाहन क्र.एम.एच ३४ ए.व्ही ९६५८ ची पंचासमक्ष तपासणी केली असता सदर वाहनात ३६ खडर्याचे बॉक्स मध्ये प्रत्येक बॉक्स मध्ये १०० नग प्रमाणे प्रत्येकी ९० एम.एल. मापाच्या देशी दारुच्या ३६०० नग निपा किं.अं. १,२६,००० रु, २) वाहतुकीस वापरलेली एक पांढ-या रंगाची सुमो वाहन क्र.एम.एच ३४ए. व्ही ९६५८ कि.अ. ४,००,००० रू असा एकुण ५,२६,००० रु चा माल जप्त केला. तपासाचे माहीतीवरुन भद्रावती येथील गुन्ह्यातील आरोपी अक्षय मन्ने व ईतर दोन ईसम यांचे विरुध्द कलम ६५ (ई), ८३ महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे.सदरची कार्यवाही मा. उप वि. पोलीस अधिकारी नयोमी साटम मॅडम यांचे मार्गदर्शनात पो.नि. बिपीन इंगळे, पोउपनि प्रियंका गेडाम, पोउपनि मनोहर नांदे, पो. हवा/१३०६ रामप्रसाद नैताम, नापोशि / २४९४ निकेश ढेंगे, पो. शि शैलेश द्रुगवार यांनी केली आहे.
0 comments:
Post a Comment