वरोरा तालुका प्रतिनिधी:-शेगाव कक्ष क्र. 550 मध्ये वनकर्मचारी जि. एम. बोठे वनरक्षक शेगाव व रोजनदारी वनमजुर गस्त करीत असतांना आरोपी बाबाराव नारायण खाटीक, अंकुश शामराव मेश्राम, उमेश भावराव किन्नाके, परसराम देविदास शेडमाके, बंडू महादेव नन्नावरे व सुरज ज्ञानेश्वर मगरे सर्व रा. मेसा है ट्रॅक्टर क्रमांक MH 34 CD 1540 व ट्रॉली क्रमांक MH-33-F-4385 ने राखीव वनातील कक्ष क्र. 550 च्या नाल्या मधुन अवैधरित्या रेतीची उत्खनन करतांना आढळून आले.
The forest department seized the tractor with sand
करीता सदर रेती सहित ट्रॅक्टर व ट्रॉली ताब्यात घेऊन वनगुन्हा नोंद करुन वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा येथे आणण्यात आले.पुढील चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी सतिश के. शेंडे, यांचे मार्गदर्शनात जे. के. लोणकर क्षे.स. शेगाव व जि. एम. बोधे वनरक्षक शेगाव, चंदेल वनरक्षक मेसा करीत आहे.
0 comments:
Post a Comment