Ads

आमदार किशोर जोरगेवार यांनी केले राणी हिराई यांना अभिवादन

चंद्रपुर :- राणी हिराई जंयती निमित्त बिरसा क्रांती दलाच्या वतीने अंचलेश्वर गेट येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी राणी हिराई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
MLA Kishore Jorgewar greeted Rani Hirai
यावेळी बिरसा क्रांती दलचे जिल्हाध्यक्ष अशोक उईके, जिल्हा संघटक राजेंद्र दुर्वे,जिल्हा महासचिव रेखा कुमरे, शहर उपाध्यक्ष मोनिका मडावी, यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाच्या महिला शहर प्रमूख वैशाली मेश्राम, सलिम शेख, किशोर शेडमाके, रजनी कुमरे, लीना शेडमाके, कमलेश आश्राम, रुपा टेकाम, भोला मडावी, विनोद अनंतवार, रत्नमाला धुर्वे, राहुल खाडे, विद्यासागर मेश्राम, आशिष दासलवार, पौर्णिमा आश्राम, आदींची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही राणी हिराई यांची जंयती चंद्रपूरात मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. यावेळी बिरसा क्रांती दलच्या वतीने अंचलेश्वर गेट येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी येथे समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार यांनी राणी हिराई यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत अभिवदन केले. राणी हिराई यांच्या पवित्र स्मृती सदैव आपल्यासाठी प्रेरणादाई आहेत. त्यांनी चंद्रपूरात उभारलेले वास्तु चंद्रपूरचा गौरव असुन त्याचे जतन करण्याचा संकल्प आपण त्यांच्या जयंती दिनी करण्याचे आवाहण यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment