Ads

आचारसंहितेने गरिबांचं पोट भरणार का ?

घाटंजी तालुका प्रतिनिधी :- गेल्या १५ मार्च २०२४ पासून घाटंजी पंचायत समितीकडून राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करण्यास अडचण येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत असलेल्या वैयक्तिक सिंचन विहीर, गुरांचे गोठे, घरकुल इ. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी शेतकरी व सामान्य नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मनरेगा योजनेचे अपुऱ्या मनुष्य बळामुळे तीन तेरा वाजत असून शासनाची मागेल त्याला विहीर योजना वांझोटी ठरत आहे.
Will the code of conduct feed the poor?
तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीसह ११० खेड्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेची विविध कामे प्रलंबित असून या सर्व कामाचे मस्टर काढणे, एम.बी. रेकॉर्ड करणे, पेमेंट अदा करणे इ. कामे करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याने, मार्च एन्डींग व आचार संहितेचे कारण पुढे करीत सदर कामे ठप्प पाडली आहे. आदर्श आचारसंहितेने गरीबाची पोट भरणार का? गरिबाच्या हाताला का मिळणार का? तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वैयक्तिक सिंचन विहिरी पूर्ण होईल का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
तसेच अनुसूचित जाती-जमाती साठी वैयक्तिक सिंचन विहीरीकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना, बिरसामुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ मिळण्याकरीता लाभार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना सुद्धा प्रभावीपणे राबविल्या जात नसल्याचे दिसते. शासनाकडून या योजनेच्या घरकुलाकरीता तुटपुंजे अनुदान मिळत असून बांधकामाकरीता शासकीय भावात रेती मिळणे अपेक्षित आहे. या सर्व विविध योजना प्रभावीपणे राबविण्याकरीता पंचायत स्तरावर उपाययोजना करावी. याकरीता यापूर्वी सुद्धा संबंधीत कार्यालयाला अनेक निवेदने सादर करण्यात आले आहे. परंतु संबंधीत जिल्हा प्रशासनाने अजूनही कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
तरी मागण्याच्या संदर्भात सकारात्मक कार्यवाही करुन न्याय देण्यात यावा अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र जन आंदोलन करण्यात येईल. यामध्ये म.प्रा.रो.ह. योजनेच्या विविध कामाचे मजुराचे मस्टर (हजेरी पत्रक) तात्काळ देण्यात यावे, म.ग्रा.रो.ह.योजनेचे पंचायत समिती स्तरावर मजुराचे मस्टर (हजेरी पत्रक) काढण्याकरीता तीन ते चार डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करावी, म.ग्रा.रो.ह.योजना यशस्वीपणे राबविणेकरीता पुरेसे मनुष्यबळ सहकार्यक्रम अधिकारी, तांत्रीक अधिकारी, कर्मचारी यांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, म.ग्रा.रो.ह.योजनेचे मजुराचे मस्टर (हजेरी पत्रक) ग्रामस्तरावर काढण्यासाठी जिल्ह्यात सुरु केलेल्या योजनेत घाटंजी तालुक्याचा समावेश करावा, जानेवारी २०२४ पासून प्रलंबीत असलेला म.ग्रा.रो.ह.योजनेचा अकुशल निधी (मजुराची मजुरी) तात्काळ देण्यात यावा, अनुसूचित जाती-जमाती वैयक्तिक सिंचन विहीरी करीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, प्रधानमंत्री आवास योजना, मोदी आवास योजना, शबरी आदिवासी आवास योजना, रमाई आवास योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना तात्काळ निधी वितरीत करण्यात यावा, घरकुल योजनेच्या व सिंचन विहीरीच्या सर्वत्र लाभार्थ्यांना शासकीय भावात रेती (वाळू) उपलब्ध करून देण्यात यावी. अशा मागण्याचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना माननीय तहसीलदार साहेब श्री मेंढे यांच्यामार्फत पाठविण्यात आले यावेळी पांडुरंग निकोडे, मोरेश्वर वातीले, प्रदीप राठोड, वामन राठोड, दशरथ मोहूर्ले, दिनेश गाऊत्रे, बंडू तोडसाम, रमेश पाटील, अनिल पवार, विनोद पेटकुले, रोहिदास जाधव,विठ्ठल सुरपाम, अमोल गेडाम, सोमा आत्राम, भीमराव आत्राम, संदीप सुरपाम हजर होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment