राजुरा - महाराष्ट्र अथलेटिक संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय वरिष्ठ गट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन नागपूर येथे दिनांक 1 ते 3 जून 2024 रोजी आयोजित केले आहे. करिता 18 वर्षा वरील महिला व पुरुष यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा व राज्य स्तरीय स्पर्धे करिता निवड चाचणी चे आयोजन केले आहे.
Conducting district level senior group athletics competition and youth group selection test on 11th and 12th May
सदर स्पर्धा 11 व 12 मे 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर च्या सिंथेटिक पटांगणात आयोजित केलेली आहे.खेळाडू सदर स्पर्धेत 100मी, 200मी, 400मी, 800मी, 1500मी, 5000मी, 10000मी धावणे, 20000मी चालणे, थाळी, गोळा, भाला फेकणे, लांब उडी व तिहेरी उडी तसेच रीले चा स्पर्धेत भाग घेता येईल. विजयी प्रथम तीन खेळाडूंना चंद्रपूर जिल्हा ॲथलेटिक्स संघटने तर्फे राज्य स्तरीय स्पर्धेत सहभागी होता येईल. सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता खेळाडूंना ए.एफ.आई. नोंदणी क्रमांक, जन्माचा दाखला, आधारकार्ड व 2 पासपोर्ट छायाचित्र असणे अनिवार्य आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी सदर स्पर्धेत सहभागी होण्याकरिता स्पर्धा आयोजक श्री सुरेश अडपेवार 9822449916, कु. पूर्वा खेरकर 9552486804, प्रा. संगीता बंबोडे 9271455198. यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment