Ads

निर्माणी पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात अवास्तव खर्च केल्याचा सदस्यांचा पत्रपरिषदेतून आरोप.

भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
आयुध निर्माणी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कम्युनिटी हाल मधे घेण्यात आलेल्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात अवास्तव खर्च करण्याला संस्थेच्या बाराशे साठ सदस्यांचा लिखीत विरोध असतांना संचालक मंडळाने आपला मनमानी कारभार करीत सदर कार्यक्रमावर अवास्तव खर्च करून पतसंस्थेच्या पैशाचा नाहक खर्च केल्याचा आरोप पतसंस्थेच्या सदस्यांनी कार्यालय परीसरात घेतलेल्या एका पत्रपरिषदेतून केला आहे.
याबद्दलचे निवेदन संचालक मंडळाला सादर करण्यात आले असुन झालेला हा अवास्तव खर्च संस्थेचे व्यवस्थापक व संचालक मंडळाकडून वसुल करण्यात यावा अशी मागणिही पतसंस्थेच्या सदस्यांनी पत्रपरिषदेतून केली आहे.
Allegation of members from the press conference of unreasonable expenditure in the golden jubilee program of the factory credit institution.
सदर संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा कार्यक्रम निर्माणी वसाहतितील कैमुनिटी हालमधे घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी संचालक मंडळाकडून खर्चाची मोठी तरतूद करण्यात आली.कार्यक्रमात अवास्तव खर्च करण्याऐवजी या पैशातून संस्थेच्या संस्थेच्या सदस्यांना लाभांष देण्यात यावा किंवा एखादी भेटवस्तू देण्यात यावी अशी मागणी करीत सदस्यांनी अवास्तव खर्चाला विरोध केला. मात्र संचालक मंडळाने यि विरोधाला न जुमानता सदर कार्यक्रम घेऊन अवास्तव खर्च करीत संस्थेच्या पैशाची उधळपट्टी केल्याचा आरोप यावेळी सदस्यांनी केला.हा सर्व खर्च संस्थेच्या व्यवस्थापकाकडून व संचालकांकडून वसुल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.पत्रपरिषदेला रविंद्र खामनकर,प्रशांत सोनटक्के व अन्य सदस्य उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment