Ads

तेंदूपत्ता तोडायला गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

सिंदेवाही :26 मे 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव येथे प्रभाकर अंबादास वेठे 48 रा. सिंदेवाही पोलीस स्टेशन अंतर्गत वनविभाग कारघाटा कंपार्टमेंट क्रमांक 257 च्या कच्छेपार कारघाटा वन संकुलात. डोंगरगाव सिंदेवाही येथील जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. जंगलात लपलेल्या वाघाने प्रभाकरवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात प्रभाकरचा जागीच मृत्यू झाला.
man who went to Collect tendu leaves died in a tiger attack
घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह विच्छेदनासाठी सिंदेवाही उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी सिंदेवाही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तपास करत आहेत. तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात न जाण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment