Ads

घाटंजी तालुक्यातील नद्यांमध्ये रेती उपसाचे खड्डेच खड्डे

घाटंजी तालुका प्रतिनिधी :-घाटंजी तालुक्यातून वाघाडी वानरी अडाण अरुणावती पैनगंगा ह्या नद्या वाहत असून या तालुक्याला गौण खनिजांची जणुकाही नैसर्गिक देणगीच लाभली आहे परंतु प्रशासनाच्या प्रशासकीय अडचणींमुळे रेतीचा एकही घाट हर्रास न झाल्याने रेती चोरीचे प्रमाण एवढे वाढले आहे की महसूल व पोलीस प्रशासनाच्या कर्मचाऱ्याच्या अंगावर धावत जाऊन धक्काबुक्की चे प्रकरण घडल्याने अवैद्य रेती चोरट्यांची हिम्मत एवढी वाढून गेली आहे की ते दिवस रात्र रेतीचे साठे करून संपूर्ण तालुक्यात रेती वाहतूक सर्रास चालू आहे याला आळा बसविण्याकरिता महसूल प्रशासनाने रात्रगस्तीची चमु नेहमी असताना सुद्धा एकही रेती चोरटा यांना गवसला नाही हे विशेष आणि पोलीस प्रशासनाने एकाही रेती चोरट्यांला आज पर्यंत पकडले नाही त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक घाटावर नदीत खड्डेच खड्डे खोदून ठेवल्याने भविष्यात यामध्ये जीवित हानी होऊ शकते अशी शंका तालुक्यामधील जनतेत चर्चिल्या जात आहे.
The rivers in Ghatji taluk are filled with sand pits
कारण काही वर्षांपूर्वी नामापुर रेती घाटात अशाच खड्ड्यात अंदाज न लागल्याने यात मुलगा डुंबून मृत्युमुखी पडला होता तर घाटावरून ट्रॅक्टरचे मुंडके उलटे झाल्याने एका आदिवासी ड्रायव्हरला आपले प्राण गमवावे लागले तर कोळी उंदरणी येथे पाण्यातून रेती काढताना खड्ड्याचा अंदाज न आल्याने एका गरीब मजुराला आपले प्राण गमवावे लागलेले एवढे प्रकरण होऊन सुद्धा नद्यांमध्ये रेती उपसा पोटी जे खड्डेच खड्डे आज रोजी तयार झाले आहे त्यावर अंकुश लावण्यावर महसूल प्रशासन सपसेल अपयशी ठरले आहे
यात निम्बर्डा लिंगी कोळी उंदरणी कापसी कोपरी घाट व माणूसदरी घाटात नद्यांमध्ये खड्डेच खड्डे खोदून हवे ते रेती चोरण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे या घाटातील महसूल प्रशासनाचे तलाठी व मंडळ अधिकारी तालुक्याच्या ठिकाणी आपले साजे थाटलयाने या विभागाची भीती चोरट्याच्या मनातून कायमची निघून गेली आहे परिणामी रेती चोरीचे प्रमाण वाढीस लागले आहे
अगदी पावसाळा तोंडावर आल्यान प्रत्येक बांधकाम करणाऱ्या व्यक्तीला आपले घर पावसाळ्याच्या आत पूर्ण व्हावे या हेतूने नाईलाजास्तव अवाच्या सव्वा भाव देऊन चोरटी रेती विकत घेऊन आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करीत असल्याचे दिसते परंतु हे स्वप्न घरकुल वाल्यांचे दिवा स्वप्नच झाले आहे कारण आज पर्यंत तालुक्यातील एकाही घरकुल वाल्याला अजून पर्यंत रेती न मिळाल्याने त्यांचे स्वप्न स्वप्नच राहिले
तेव्हा जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे लक्ष घालून घरकुल वाल्यांना रेती उपलब्ध करून त्यांना न्याय द्यावा व प्रशासनाने जो रेती डेपो उभारला त्याचा फायदा घरकुलवासीयांना करून द्यावा अशी मागणी होत आहे
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment