Ads

चंद्रपूर लोकसभेची उत्कंठा शीगेला

घाटंजी तालुका प्रतिनिधी:-
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी पार पडली. दीड महिन्यांच्या कालावधीनंतर येत्या ४ जून रोजी पडोली एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाउन येथे मतमोजणी होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वांचे मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. मंगळवारी (दि.४) मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. यासाठी ३७९ कर्मचारी १०१ टेबलवर मतमोजणी करणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सहाही विधानसभानिहाय मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहे. यामध्ये राजुरा २४, चंद्रपूर २८, बल्लारपूर २६, वरोरा २५, वणी २५ आर्णी २७ अशा फेऱ्या होणार आहे.
Chandrapur Lok Sabha got excited
मतमोजणीकरिता प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, या व्यवस्थेची पाहणी करण्याकरिता निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी वखार महामंडळाच्या गोडाउन येथील स्ट्रॉग रूमसह मतमोजणी केंद्राची पाहणी केली.
व्यवस्था, मीडिया सेंटर आदींचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, अजय चरडे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सतीश खडसे उपस्थित होते.

व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी गौडा यांनी मतमोजणी केंद्राला भेट दिली. प्रत्यक्ष मतमोजणीकरिता येथे असलेल्या एकूण टेबलची व्यवस्था, उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी व मतमोजणी प्रतिनिधींच्या बसण्याची व्यवस्था, लावण्यात आलेले बॅरेकेटिंग, सीसीटीव्ही, वीज व्यवस्था, ईव्हीएम असलेल्या स्ट्राँगरूमचा मार्ग, सुरक्षा या बाबतीत आढावा घेतला.
..................

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मतमोजणी आवाराच्या, परिसराच्या सभोवताली १०० मीटर परिघापासून राज्य पोलिस, मतमोजणी आवाराच्या प्रवेशद्वारावर राज्य सशस्त्र पोलिस आणि मतमोजणी कक्षाच्या द्वाराजवळ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल तैनात राहणार आहे.
................

मोबाइल, कॅमेरा करावा लागेल जमा

मतमोजणी केंद्रात मोबाइल, कॅमेरा, लॅपटॉप, आयपॅड, तसेच कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. प्रत्यक्ष मतमोजणी केंद्रात जाताना कर्मचाऱ्यांना मोबाइल, कॅमेरा मीडिया सेंटर येथे जमा करावा लागणार आहे. मतमोजणी परिसरात तीनस्तरीय सुरक्षा व्यवस्था असल्याने प्रत्यक्ष मतमोजणी स्थळी एकदाच प्रवेश देण्यात येणार आहे. परिसर सोडल्यास पुन्हा प्रवेश नाकारण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने म्हटले आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघासाठी (ईव्हीएम मतमोजणी) प्रत्येकी १४ टेबल याप्रमाणे एकूण ८४ टेबल, टपाली मतपत्रिका मोजण्याकरिता ९ टेबल आणि ईटीपीबीएमएस (सव्र्व्हिस व्होटर मतपत्रिका) मोजण्याकरिता ८ टेबल असे एकूण १०१ टेबल राहणार आहेत.
.............
प्रतिभा धानोरकर अव्वल

झालेल्या निवडणुकीत प्रतिनिधीने सर्वे केलेला असता काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर 40 हजार ते एक लाख मताच्या फरकाने निवडून येत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे काँग्रेसच्या गटात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment